आरटीओ कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:44 PM2020-08-24T22:44:19+5:302020-08-24T22:46:55+5:30

कोरोनाचा शिरकाव आता शासकीय कार्यालयात होऊ लागला आहे. पूर्व नागपूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील एक कर्मचारी सोमवारी पॉझिटिव्ह येताच खळबळ उडाली.

Corona infiltrated the RTO office as well | आरटीओ कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव

आरटीओ कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव

Next
ठळक मुद्देपूर्व आरटीओ कार्यालय सुरूच राहणार : कर्मचारी, अधिकारी दहशतीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा शिरकाव आता शासकीय कार्यालयात होऊ लागला आहे. पूर्व नागपूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील एक कर्मचारी सोमवारी पॉझिटिव्ह येताच खळबळ उडाली. कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. परंतु कार्यालय बंद न ठेवण्याचा निर्णय येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील १८ कर्मचारी पॉझिटिव्ह येताच आठवडाभरासाठी कार्यालयीन सेवा बंद ठेवण्यात आल्याची घटना ताजी असताना आता आरटीओ कार्यालयातही कर्मचारी पॉझिटिव्ह आला. हा कर्मचारी ‘नॉन ट्रान्सपोर्ट’ विभागाची कामे पाहतो. याला लक्षणे नव्हती, परंतु लोकांच्या संपर्कात येत असल्याने त्याने कोरोनाची तपासणी के ली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तो शनिवारपर्यंत कार्यालयात आला होता. यामुळे त्याच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांपर्यंत भीतीचे वातावरण पसरले. दुपारपर्यंत कार्यालय बंद करण्यात आल्याची अफवाही पसरली होती. परंतु उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जाधव यांनी ही अफवा असल्याचे सांगून कार्यालय बंद न ठेवण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ते म्हणाले, अद्याप कुठल्याच कर्मचाऱ्याला लक्षणे नाहीत. परंतु ज्यांना कोरोनाची तपासणी करावयाची आहे, त्यांनी करून घ्यावी, असेही ते म्हणाले.

Web Title: Corona infiltrated the RTO office as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.