अल्वपयीन मुलांमध्येही वाढतोय कोरोना; आज १२ रुग्णांची नोंद, २२ अ‍ॅक्टीव्ह!

By सुमेध वाघमार | Published: December 29, 2023 07:16 PM2023-12-29T19:16:46+5:302023-12-29T19:18:11+5:30

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये पाच महिलांचा समावेश

Corona is increasing even in infants; 12 patients registered today, 22 active! | अल्वपयीन मुलांमध्येही वाढतोय कोरोना; आज १२ रुग्णांची नोंद, २२ अ‍ॅक्टीव्ह!

अल्वपयीन मुलांमध्येही वाढतोय कोरोना; आज १२ रुग्णांची नोंद, २२ अ‍ॅक्टीव्ह!

सुमेध वाघमारे, नागपूर: मोठ्यांसोबतच अल्पवयीन मुलांमध्येही आता कोरोना दिसून येऊ लागला आहे. शुक्रवारी शहरातू ११ तर ग्रामीणमधून १ पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये ५ रुग्ण अल्पवयीन आहेत. या सर्वच रुग्णांना सौम्य लक्षण असून ते होम आयसोलेशनमध्ये आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. शुक्रवारी पॉझिटीव्ह आलेल्या अल्वपयीन रुग्णांमध्ये १२ ते १७ वयोगटातील मुले आहेत. यामुळे मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये पाच महिला व सहा पुरुष आहेत. २२ रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ४ रुग्ण विविध खासगी रुग्णालयात उपचाराखाली आहेत. सध्या लक्ष्मीनगर, धरमपेठ व हनुमाननगर, नेहरूनगर व धंतोली झोनमधील सर्वाधिक रुग्ण आहेत.

Web Title: Corona is increasing even in infants; 12 patients registered today, 22 active!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.