विदर्भात कोरोनाने २५ दिवसात १४५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 01:07 AM2020-07-26T01:07:47+5:302020-07-26T01:13:05+5:30

विदर्भात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना मृतांची संख्याही वाढत आहे. २५ जुलै रोजी मृतांची नोंद २९९ झाली. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण २.५९ टक्के आहे.

Corona kills 145 in 25 days in Vidarbha | विदर्भात कोरोनाने २५ दिवसात १४५ मृत्यू

विदर्भात कोरोनाने २५ दिवसात १४५ मृत्यू

Next
ठळक मुद्देमृतांची एकूण संख्या २९९ : सर्वाधिक मृत्यू अकोल्यात५१ ते ६० या वयोगटात मृत्यूचे प्रमाण अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना मृतांची संख्याही वाढत आहे. २५ जुलै रोजी मृतांची नोंद २९९ झाली. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण २.५९ टक्के आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात केवळ एका मृताची नोंद असताना मागील २५ दिवसात १४५ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू ५१ ते ६० या वयोगटात आहेत. कोरोनाच्या विळख्यात आता विदर्भाचे ११ ही जिल्हे आले आहेत. लॉकडाऊन अनलॉक होताच रुग्णांसोबतच मृत्यूची संख्याही वाढू लागली आहे. नागपूर विभागात येत असलेल्या सहा जिल्ह्यापैकी मागील आठवड्यापर्यंत दोन जिल्ह्यात मृत्यूची नोंद नव्हती. मात्र यातील भंडारा जिल्ह्यात एका मृत्यूची नोंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यात अद्यापही मृत्यूची नोंद झालेली नाही. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात मृत्यूची नोंद आहे.

नागपूर विभागात मृत्यूची संख्या ९१
नागपूर विभागात सर्वाधिक मृत्यू नागपूर जिल्ह्यात झाले आहेत. २५ जुलै सायंकाळपर्यंत ७६ मृत्यूची नोंद होती. गोंदिया जिल्ह्यात तीन, वर्धा जिल्ह्यात नऊ, गडचिरोली एक व भंडारा जिल्ह्यात दोन मृत्यू आहेत. एकूण मृतांची संख्या ९१ झाली आहे.

अमरावती विभागात मृत्यूची संख्या २०८
अमरावती विभागात सर्वाधिक मृत्यू अकोला जिल्ह्यात आहेत. येथे १०० मृत्यू झाले आहेत. याशिवाय, बुलडाण्यात २५, वाशिम जिल्ह्यात नऊ, यवतमाळ जिल्ह्यात २७ तर अमरावती जिल्ह्यात ४७ मृत्यूची नोंद आहे. अशा एकूण २०८ मृत्यूची नोंद झाली आहे.

या महिन्यात ५४ मृतांची वाढ
मार्च महिन्यात विदर्भात केवळ एका मृत्यूची नोंद होती. मात्र नंतर रुग्णसंख्या वाढत गेली तशी मृतांची संख्याही वाढली. एप्रिल महिन्यात १२, मे महिन्यात ५४, जून महिन्यात ९१ तर जुलै महिन्याच्या २५ तारखेपर्यंत १४५ मृतांची नोंद झाली. गेल्या महिन्याच्या तुलनेत ५४ मृतांमध्ये वाढ झाली. - असे वाढले मृत्यू महिना मृत्यूची संख्या मार्च ०१ एप्रिल १२ मे ५४ जून ९१ जुलै १४५ (२५ जुलैपर्यंत)

Web Title: Corona kills 145 in 25 days in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.