कोरोनामुळे राज्यात ९३ रेशन दुकानदारांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:08 AM2021-02-11T04:08:22+5:302021-02-11T04:08:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या महामारीत पूर्ण वर्ष गेले. यावेळी अत्यावश्यक सेवा म्हणून रेशन दुकानदारांनी मोठी जबाबदारी पार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या महामारीत पूर्ण वर्ष गेले. यावेळी अत्यावश्यक सेवा म्हणून रेशन दुकानदारांनी मोठी जबाबदारी पार पाडली. रेशन दुकानदारांमुळेच शासनाचे मोफत धान्य गरिबांपर्यंत पोहोचू शकले. शासनानेही ही बाब मान्य केली. ही सेवा देत असतानाच राज्यभरात तब्बल ९३ रेशन दुकानदारांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला. केवळ ९३ दुकानदार नव्हे
संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहारही केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कोणतीही व्यक्ती धान्यापासून वंचित राहू नये म्हणून केंद्र शासनाने रेशन दुकानदारांद्वारे वितरणाची व्यवस्था सुरू ठेवली. महामारीच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता रेशन दुकानदारांनी धान्याचे वितरण केले. यामुळे अनेक दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह झाले. राज्यातील जवळपास ९३ रेशन दुकानदारांचा कोरोनाने मृत्यू झाला. यात सर्वाधिक पुणे विभागातील ३२, मुंबईतील २६, रायगडमध्ये ८, नागपुरात ६ आणि अमरावतीतील ८ दुकानदारांचा समावेश आहे. कोरोना काळात पोलीस आणि डॉक्टर यांना काेरोना योध्दे म्हणून मृत्यूनंतर ५० लाखांचे विमा सुरक्षा कवच देण्यात आले आहे. मग हे विम्याचे कवच रेशनदुकानदारांना लागू का नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.