अमरावतीत कोरोनाचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:08 AM2021-02-24T04:08:04+5:302021-02-24T04:08:04+5:30

नागपूर : विदर्भात ३४९ दिवसानंतर सोमवारी कोरोना बाधितांची संख्या ३००१२५ पोहाेचली असताना मंगळवारी २,८६३ नव्या रुग्णांची भर पडली. सप्टेंबरनंतर ...

Corona outbreak in Amravati | अमरावतीत कोरोनाचा उद्रेक

अमरावतीत कोरोनाचा उद्रेक

googlenewsNext

नागपूर : विदर्भात ३४९ दिवसानंतर सोमवारी कोरोना बाधितांची संख्या ३००१२५ पोहाेचली असताना मंगळवारी २,८६३ नव्या रुग्णांची भर पडली. सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण आढळून आले. धक्कादायक म्हणजे, अमरावती जिल्ह्यात आज कोरोनाचा उद्रेक झाला. तब्बल ९२६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. नागपूर जिल्ह्यात ६९१ रुग्णांची नोंद झाली. नागपूर विभागाच्या तुलनेत अमरावती विभागात झपाट्याने रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. बुलडाण्यात ४१६, अकोल्यात २७७, यवतमाळमध्ये २४६, तर वर्धेत १२५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. विदर्भात रुग्णांची एकूण संख्या ३०३७३७ वर पोहाेचली.

जिल्हा रुग्ण ए. रुग्ण मृत्यू

नागपूर ६९१ १४४५३४ ०८

भंडारा २२ १३५४३ ००

वर्धा १२५ ११४९२ ०२

गोंदिया १६ १४३५५ ००

गडचिरोली ०५ ९४७३ ००

चंद्रपूर ५५ २३४३७ ००

अमरावती ९२६ ३११२३ ०६

अकोला २७७ १४४४५ ०२

यवतमाळ २४६ १६५०१ ०२

बुलडाणा ४१६ १६९१२ ००

वाशिम ८७ ७९२२ ००

Web Title: Corona outbreak in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.