नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णांत चढ उतार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 12:53 PM2021-08-04T12:53:04+5:302021-08-04T12:53:59+5:30
Nagpur News कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या सोमवारी ३ वर आली असताना मंगळवारी वाढ होऊन ९ झाली. जुलै महिन्यापासून रुग्णसंख्येचा हा चढ उतार सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या सोमवारी ३ वर आली असताना मंगळवारी वाढ होऊन ९ झाली. जुलै महिन्यापासून रुग्णसंख्येचा हा चढ उतार सुरू आहे. मागील दोन दिवसापासून एकाही रुग्णाचा मृत्यूची नोंद नाही. बाधितांची एकूण संख्या ४,९२,९०१ झाली असून मृतांची संख्या १०,११७ वर स्थिर आहे.
नागपूर जिल्ह्यात मंगळवारी ४,८११ चाचण्या झाल्या. यात शहरात ३६८५ चाचण्यांमधून ६ तर ग्रामीणमध्ये ११२६ चाचण्यांमधून ३ रुग्ण आढळून आले. शहरात पॉझिटिव्हीटीचा दर ०.१६ टक्के तर हाच दर ग्रामीणमध्ये ०.२६ टक्क्यांवर आला आहे. शहरात रुग्णांची एकूण संख्या ३,३९,९९१ व मृतांची संख्या ५,८९२ झाली. ग्रामीणमध्ये बाधितांची संख्या १,४६,१०५ झाली असून मृतांची संख्या २६०३ वर गेली आहे. आज ९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ४,८२,५९६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या कोरोनाचे १८८ रुग्ण सक्रिय आहेत. यातील १३५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ५३ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे, मागील १५ दिवसांत २ मृत्यू नोंदविण्यात आले.