पॉश वसाहतीत कोरोनाचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:09 AM2021-09-18T04:09:02+5:302021-09-18T04:09:02+5:30
नागपूर : कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या दोन दिवसांपासून १०च्या आत आहे. शुक्रवारी शहरात आढळून आलेले कोरोनाचे रुग्ण हे पॉश वसाहतीतील ...
नागपूर : कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या दोन दिवसांपासून १०च्या आत आहे. शुक्रवारी शहरात आढळून आलेले कोरोनाचे रुग्ण हे पॉश वसाहतीतील आहेत. ८ नव्या रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या ४,९३,१७२ झाली आहे. आज मृत्यूची नोंद नसल्याने मृतांची संख्या १०,१२० वर स्थिर आहे.
नागपूर जिल्ह्यात ४,६९२ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील ३,२५१ तपासण्यांमधून ६, ग्रामीणमध्ये १,४३९ तपासण्यांमधून १, तर जिल्ह्याबाहेरील १ रुग्ण आहे. शहरात शुक्रवारी आढळून आलेल्या बाधितांमध्ये मनपाच्या धरमपेठ झोनमधील ३, लक्ष्मीनगर झोनमधील २ तर धरमपेठ झोनमधील १ रुग्ण आहे. शहरात आतापर्यंत रुग्णांची एकूण संख्या ३,४०,१७९ व मृतांची संख्या ५,८९३, ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या १,४६,१५७ व मृतांची संख्या २,६०३ तर जिल्हाबाहेरील रुग्णांची संख्या ६,८३६ व मृतांची संख्या १,६२४ झाली आहे. आज ८ रुग्ण बरे झाल्याने ४,८२,९८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा दर ९७.९३ टक्के आहे. सध्या कोरोनाचे ६९ रुग्ण सक्रिय आहेत. यात शहरातील ३९, ग्रामीणमधील २६ तर जिल्ह्याबाहेरील ४ रुग्ण आहेत.
- मेडिकलमध्ये व एम्समध्ये ११ रुग्ण
शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. मेडिकल व एम्समध्ये प्रत्येकी ११ रुग्ण भरती आहे. महत्त्वाचे म्हणजे, मेयोमध्ये एकही रुग्ण नाही. आमदार निवासात ३५ तर उर्वरित रुग्ण विविध खासगी रुग्णालयात आहेत.
:: कोरोनाची शुक्रवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ४,६९२
शहर : ६ रु ग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : १ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण : ४,९३,१७२
ए. सक्रिय रुग्ण : ६९
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,९८३
ए. मृत्यू : १०,१२०