आता कोरोना रुग्णांना थेट भरती करून घेता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:13 AM2021-05-05T04:13:22+5:302021-05-05T04:13:22+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. व जिल्हाधिकारी रवींद्र ...

Corona patients will no longer be able to be recruited directly | आता कोरोना रुग्णांना थेट भरती करून घेता येणार नाही

आता कोरोना रुग्णांना थेट भरती करून घेता येणार नाही

Next

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नागपूर शहर व जिल्ह्यातील कोरोनासंदर्भातील प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सेंट्रल कंट्रोल रूम स्थापन केला आहे. यासंदर्भात मंगळवारी आदेश जारी करण्यात आला. त्यानुसार यापुढे कोणत्याही रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना थेट भरती करता येणार नाही. यासंदर्भात आता सेंट्रल कंट्रोल रूमद्वारे आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.

सदर कंट्रोल रूम महानगरपालिका इमारतीच्या सहाव्या माळ्यावर सर्व दिवशी २४ तास कार्यरत राहणार आहे. कंट्रोल रूमकरिता स्वतंत्र फोन क्रमांक व व्हॉट्सअ‍ॅप सुविधा असणारे मोबाइल क्रमांक देण्यात आले आहेत. गरजू नागरिकांना संबंधित क्रमांकावर संपर्क साधून आवश्यक मदतीची मागणी करता येणार आहे. कंट्रोल रूम पथकाची सकाळी ६ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री १० व रात्री १० ते सकाळी ६ अशा तीन पाळीमध्ये विभागणी करण्यात आली आहे. हे पथक कोरोना रुग्णांचा आरटीपीसीआर अहवाल, एचआरसीटी अहवाल इत्यादी माहिती घेऊन त्या आधारावर रुग्णांना भरती करणे किंवा घरीच उपचार करण्यावर अर्ध्या तासात आवश्यक निर्णय घेईल. तसेच, समर्पित सॉफ्टवेअरद्वारे खाट बुक करून संबंधित सर्व माहिती व ओटीपी रुग्ण किंवा त्याच्या नातेवाइकाला कळवली जाईल. ओटीपी दोन तास वैध राहील. या वेळेत रुग्ण भरती न झाल्यास संबंधित खाट रिक्त घोषित करून दुसऱ्या रुग्णांस दिली जाईल. एखादा रुग्ण गंभीर असल्यास रुग्णालये त्याला भरती करून तातडीने उपचार सुरू करू शकतील; परंतु याबाबत फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित रुग्णालयावर कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाईल.

------------

औषधे वितरणाचे नियोजन

कोरोनावर प्रभावी सिद्ध होत असलेले रेमडेसिविर, टोसिलिझुमाब इत्यादी औषधांचे कोरोना रुग्णालयांना समान वितरण करण्याची जबाबदारी आता कंट्रोल रूम सांभाळेल. तसेच कोरोना रुग्णालयांनी या औषधांची केलेली मागणी व त्यानुसार त्यांना औषधांचा पुरवठा करण्यावरही कंट्रोल रूम लक्ष ठेवणार आहे.

-------------

ऑक्सिजन वितरणावर पाळत

कंट्रोल रूम ऑक्सिजन वितरणावर पाळत ठेवणार आहे. तसेच यासंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी कार्य करणार आहे. ऑक्सिजन खरेदी, नियोजन व वितरण करण्याची जबाबदारीही कंट्रोल रूमवर आहे.

-----------

असे आहेत संपर्क क्रमांक

१ - कोरोना खाट मिळविण्यासाठी : ०७१२-२५६७०२१, ७७७००११५३७, ७७७००११४७२़

२ - कोरोना औषधे व ऑक्सिजन मिळविण्यासाठी : ०७१२-२५५१८६६, ७७७००११९७४

Web Title: Corona patients will no longer be able to be recruited directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.