मेडिकलमधून कोरोनाबाधित कैद्याचे पलायन : प्रशासनात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 10:23 PM2020-11-09T22:23:45+5:302020-11-09T22:26:40+5:30
Corona-positive prisoner escapes from medical कोरोनाबाधित कैद्याने मेडिकलमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. रविवारी रात्रीनंतर घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्मांण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कोरोनाबाधित कैद्याने मेडिकलमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. रविवारी रात्रीनंतर घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्मांण झाली आहे.
नरेश अंकुश महिलांगे (वय २५) असे आरोपीचे नाव आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याला वाहनचोरीत यशोधरानगर पोलिसांनी अटक केली होती. वैद्यकीय तपासणीत तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्याला कारागृहात पाठविले होते. त्यामुळे त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी दोन पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. सोमवारी पहाटे ४.३० च्या सुमारास आरोपी महिलांगे पळून गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी मेडिकल तसेच आजूबाजूचा परिसर पिंजून काढला, मात्र तो हाती लागला नाही. १५ दिवसापूर्वी अशाच प्रकारे दुसऱ्या एका कैद्याने पलायन केले होते. आता पुन्हा ही घटना घडल्याने पोलीस प्रशासन हादरले आहे.