कोरोना प्रतिबंधक लस हेच कवचकुंडल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:08 AM2021-06-26T04:08:18+5:302021-06-26T04:08:18+5:30
गुमगाव : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधक लस हेच कवचकुंडल आहे. लस अत्यंत सुरक्षित असून कोणताही गैरसमज न ...
गुमगाव : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधक लस हेच कवचकुंडल आहे. लस अत्यंत सुरक्षित असून कोणताही गैरसमज न बाळगता युवकांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन डॉ. रवी बनसोड यांनी केले.
गुमगाव येथील आयुर्वेदिक दवाखान्यात १८ वर्षावरील वयोगटाचे लसीकरण सुरू झाले आहे. याप्रसंगी डॉ. बनसोड युवकांशी संवाद साधला. सध्यातरी युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या लसीकरण मोहिमेस लाभत आहे. लसीकरणासाठी आरोग्य विभागाच्या शिल्पा भुरे, वैभव गोस्वामी, सुरेश डहाट, नरेश ताकसांडे, प्रकाश उरकुडे, सुशील काळे, अरुणा फुलकर , सरला रेवतकर, रागिणी उरकुडे, समूह आरोग्य अधिकारी अभिरुची ढोले आदी परिश्रम घेत आहेत.
----
बीज अंकुरे अंकुरे... : यंदा रोहिणी नक्षत्रात दमदार पावसाच्या सरींनी शेताशिवार ओलेचिंब केल्यानंतर मृगधारा सुद्धा अधूनमधून बरसल्या आहेत. परिणामी बळीराजाने काळ्या आईच्या कुशीत लावण केल्यानंतर बियांना अंकुर फुटून त्याचे आता रोपात रुपांतर झाले आहे. त्यामुळे बळीराजाच्या आशेला हिरवीगार पालवी फुटू लागली आहे. सध्या शेताशिवार हिरवाईने सजून गेले असून मनामनात चैतन्याची लहर निर्माण झाली असल्याचे चित्र गुमगाव परिसरात सर्वत्र दृष्टिपथास येत आहे.
छाया : मधुसूदन चरपे,गुमगाव.