कोरोना प्रतिबंधक लस विदर्भात दाखल; लसीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 11:39 AM2021-01-16T11:39:52+5:302021-01-16T11:40:13+5:30
Nagpur News कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सकाळी 10.30 वाजता पासून नागपूर जिल्ह्यातील 12 केंद्रांवर सुरुवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सकाळी 10.30 वाजता पासून नागपूर जिल्ह्यातील 12 केंद्रांवर सुरुवात झाली. शहरातील 5 केंद्रामधील डागा रुग्णालयात अॅडिशनल सिव्हिल सर्जन डॉ. संध्या डांगे, एम्समधील केंद्रावर एम्सच्या संचालक डॉ विभा दत्ता व वैद्यकीय अधीक्षक डॉ मनिष श्रीगिरीवार, मेयो रुग्णालयातील केंद्रावर अधिष्ठाता डॉ अशोक केवलिया व मेडिकलमधील केंद्रावर डॉ रीना रुपरॉय यांना प्रथम लस देण्यात आली.
भंडारा जिल्ह्यात पहिली कोरोना लस जिल्हा सामान्य रूग्णालयाचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पीयूष जक्कल यांना टोचण्यात आली. जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला.
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. डॉ. राजेंद्र जैन यांना कोरोना प्रतिबंधाची पहिली लस देण्यात आली.