कोरोना रुग्ण, मृत्युसंख्येत चढउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:06 AM2021-07-12T04:06:56+5:302021-07-12T04:06:56+5:30

नागपूर : कोरोना रुग्ण व मृत्यूच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. शनिवारी २५ रुग्ण व शून्य मृत्यूची नोंद असताना, ...

Corona sick, fluctuating mortality | कोरोना रुग्ण, मृत्युसंख्येत चढउतार

कोरोना रुग्ण, मृत्युसंख्येत चढउतार

googlenewsNext

नागपूर : कोरोना रुग्ण व मृत्यूच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. शनिवारी २५ रुग्ण व शून्य मृत्यूची नोंद असताना, रविवारी १६ रुग्ण व २ मृत्यूंची भर पडली. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,७७,३३१ झाली असून ९०३४ रुग्णांचे बळी गेले आहेत. आज २८ रुग्ण बरे झाले. कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९८.०८ टक्के नोंदविण्यात आले.

कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी तिसऱ्या लाटेची धास्ती सतावत आहे. कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’चा धोका पाहता निर्बंध कठोर केले आहेत. परंतु सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी रोखण्याला कोणी गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे. रविवारी नागपूर जिल्ह्यात ८२६५ तपासण्या झाल्या. पॉझिटिव्हिटीचा दर ०.१९ टक्के होता. शहरात ६८८३ तपासण्यांमधून ६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले. पॉझिटिव्हिटीचा दर आतापर्यंतचा सर्वात कमी, ०.०८ टक्के होता. ग्रामीणमध्ये १३८२ तपासण्यांमधून ९ रुग्णांची नोंद झाली व एका रुग्णाचा मृत्यू झाला. पॉझिटिव्हिटीचा दर ०.६५ टक्के होता.

- नमुने निगेटिव्ह येण्याचे प्रमाण ९९ टक्क्यांवर

दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट आली आहे. मागील आठ दिवसांपासून २५च्या आत रुग्ण आढळून येत आहेत. त्या तुलनेत तपासण्यांची संख्या पाच ते आठ हजार होत आहेत. यामुळे नमुने निगेटिव्ह येण्याचे प्रमाण ९९ टक्क्यांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, अनेक चौकात वाहन चालकांना थांबवून ‘आरटीपीसीआर’ केली जात आहे.

:: कोरोनाची रविवारची स्थिती

दैनिक चाचण्या : ८२६५

शहर : ६ रुग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : ९ रुग्ण व १ मृत्यू

ए. बाधित रुग्ण : ४,७७,३३१

ए. सक्रिय रुग्ण : १४०

ए. बरे झालेले रुग्ण : ४,६८,१५७

ए. मृत्यू : ९,०३४

Web Title: Corona sick, fluctuating mortality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.