ग्रामीणमध्ये कोरोना स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:12 AM2021-08-22T04:12:22+5:302021-08-22T04:12:22+5:30

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ग्रामीणमध्ये मागील तीन दिवसांपासून एकही रुग्ण किंवा मृत्यूची नोंद झाली नाही. कोरोनाची स्थिती ...

Corona stable in rural | ग्रामीणमध्ये कोरोना स्थिर

ग्रामीणमध्ये कोरोना स्थिर

googlenewsNext

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ग्रामीणमध्ये मागील तीन दिवसांपासून एकही रुग्ण किंवा मृत्यूची नोंद झाली नाही. कोरोनाची स्थिती स्थिर असल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, शहरात शनिवारी २ रुग्ण आढळून आले. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,९२,९८६, तर मृतांची संख्या ९ दिवसांपासून १०,११८ स्थिरावली आहे.

कोरोनाची दैनंदिन संख्या या आठवड्यात ५८ टक्क्याने कमी झाली. ८ ते १४ ऑगस्टदरम्यान रुग्णांची संख्या ४३ असताना १५ ते २१ ऑगस्टदरम्यान १८ रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे या आठवड्यात एकाही मृत्यूची नोंद झोली नाही. यातही ग्रामीणमध्ये ३, शहरात १४, तर जिल्ह्याबाहेर २ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शनिवारी जिल्ह्यात ४,५९८ चाचण्या झाल्या. यात शहरात ३३१२, तर ग्रामीणमध्ये १२८६ चाचण्यांचा समावेश होता. सध्या शहरात ८२, ग्रामीणमध्ये ८, तर जिल्ह्याबाहेरील २, असे एकूण कोरोनाचे ९२ सक्रिय रुग्ण आहेत. यातील ४७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, तर ४५ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयांत उपचाराखाली आहेत. आज कोरोनाचे ८ रुग्ण बरे झाले.

:: कोरोनाची शनिवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ४,५९८

शहर : २ रुग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : ० रुग्ण व ० मृत्यू

- बाधित रुग्ण :४,९२,९८६

- सक्रिय रुग्ण : ९२

- बरे झालेले रुग्ण : ४,८२,७७६

- मृत्यू : १०११८

Web Title: Corona stable in rural

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.