५० वऱ्हाडींची कोरोना टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:08 AM2021-05-11T04:08:09+5:302021-05-11T04:08:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सतरंजीपुरा झोन क्षेत्रातील स्वीपर कॉलनी येथील रहिवासी राजेश समुंद्रे यांच्याकडे बुधवारी लग्नसमारंभ होता. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सतरंजीपुरा झोन क्षेत्रातील स्वीपर कॉलनी येथील रहिवासी राजेश समुंद्रे यांच्याकडे बुधवारी लग्नसमारंभ होता. समारंभाला १५० ते २०० नातेवाईकांची गर्दी जमवल्याने त्यांना मनपाच्या एनडीएस पथकाने ५० हजार रुपये दंड आकारला होता. गर्दीमुळे संक्रमणाचा धोका असल्याने या लग्नसमारंभात सहभागी झालेल्या वर-वधू पक्षाकडील ५० जणांची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली. उर्वरित लोकांची मनपाच्या कोरोना टेस्टिंग मोबाईल लॅबद्वारे ॲन्टिजन व आरटी-पीसीआर चाचणी केली जात आहे.
यासंदर्भात सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे यांनी राजेश समुद्रे यांना पत्र दिले असून, लग्नात सहभागी झालेल्या सर्वांची कोरोना चाचणी करून सहकार्य करण्याचे आवाहन केले होत. याला प्रतिसाद मिळाला आहे. लग्नात सहभागी झालेल्यांची टेस्ट केली जात आहे.