विनाकारण फिरणाऱ्या ७९१४ नागरिकांची कोरोना टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 08:48 PM2021-05-17T20:48:47+5:302021-05-17T20:49:56+5:30

Corona test of wandering citizens कोरोना संक्रमणाला आळा बसावा, यासाठी शहर पोलीस आणि मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना एंटीजन चाचणी सुरु करण्यात आली आहे. या संयुक्त मोहिमेत महिनाभरात ७९१४ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी २३८ कोरोना बाधित निघाले. कोरोना बाधितांना तत्काळ घरी जाऊन डॉक्टर्स सोबत संपर्क करण्याचा सल्ला देण्यात आला.

Corona test of 7914 citizens wandering for no reason | विनाकारण फिरणाऱ्या ७९१४ नागरिकांची कोरोना टेस्ट

विनाकारण फिरणाऱ्या ७९१४ नागरिकांची कोरोना टेस्ट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाला आळा बसावा, यासाठी शहर पोलीस आणि मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना एंटीजन चाचणी सुरु करण्यात आली आहे. या संयुक्त मोहिमेत महिनाभरात ७९१४ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी २३८ कोरोना बाधित निघाले. कोरोना बाधितांना तत्काळ घरी जाऊन डॉक्टर्स सोबत संपर्क करण्याचा सल्ला देण्यात आला.

            कोरोना साखळी खंडित करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार मनपा तर्फे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. विना कामाने फिरणा-या नागरिकांवर पोलीस कारवाई होत आहे. मनपाची आरोग्य यंत्रणा ११ ठिकाणी पोलिसांसोबत नागरिकांची कोरोना चाचणी करीत आहे. राणाप्रतापनगर चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, मानेवाडा चौक, खापरी नाका चौक, दिघोरी नाका चौक, मेयो रुग्णालय चौक, पारडी नाका चौक, ऑटोमोटिव्ह चौक, साई मंदिर चौक (जुनी कामठी), जुना काटोल नाका चौक आणि नवीन काटोल नाका चौक येथे चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीमुळे विना कारण फिरणाऱ्या नागरिकांवर आळा बसला आहे. मनपा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांचा मार्गदर्शनात डॉ. शुभम मनगटे आणि आरोग्य यंत्रणेची चमू ही चाचणी करीत आहे. या कामात झोनल वैद्यकीय अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांचे सहकार्य मिळत आहे.

Web Title: Corona test of 7914 citizens wandering for no reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.