आता ४० मिनिटांत कोरोनाची चाचणी; राज्याला मिळणार ७९ ट्रूनॅट मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 09:09 AM2020-05-13T09:09:14+5:302020-05-13T09:09:36+5:30

‘आरटी-पीसीआर’ या यंत्रावर कोरोना चाचणीचे निदान होणासाठी साधारण चार ते पाच तासांचा वेळ जातो. तो वेळ कमी करण्यासाठी व तातडीने जास्तीत जास्त नमुने तपासणीसाठी केंद्राने राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाला ७९ ‘ट्रूनॅट यंत्र’ उपलब्ध करून दिले आहे.

Corona test now in 40 minutes; The state will get 79 TruNet machines | आता ४० मिनिटांत कोरोनाची चाचणी; राज्याला मिळणार ७९ ट्रूनॅट मशीन

आता ४० मिनिटांत कोरोनाची चाचणी; राज्याला मिळणार ७९ ट्रूनॅट मशीन

Next
ठळक मुद्देनागपूर मनपा व जिल्हा, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, अकोल्यात होणार तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सुमेध वाघमारे
नागपूर : ‘आरटी-पीसीआर’ या यंत्रावर कोरोना चाचणीचे निदान होणासाठी साधारण चार ते पाच तासांचा वेळ जातो. तो वेळ कमी करण्यासाठी व तातडीने जास्तीत जास्त नमुने तपासणीसाठी केंद्राने राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाला ७९ ‘ट्रूनॅट यंत्र’ उपलब्ध करून दिले आहे. या यंत्रावर केवळ ४० मिनिटे ते एक तासात अहवाल प्राप्त होतो. नागपूर विभागाला १८ यंत्रे मिळणार असून यातील पहिल्या टप्प्यातील ९ यंत्रे मंगळवारी उपलब्ध झाली. हे यंत्रे नागपूर महागरपालिका, नागपूर जिल्हा, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, अकोला व विदर्भाबाहेरील जळगाव व नांदेड महानगरपालिका यांना दिले जाणार आहे.

विदर्भात कोविड-१९चा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. सोमवारी विदर्भात रुग्णांची संख्या ६६९ तर मृतांची संख्या ३५ झाली आहे. यामुळे मोठ्या संख्येत संशयित रुग्ण आढळून येत आहेत. एकट्या नागपूरच्या संस्थात्मक अलगीकरण कक्षात २३२२ संशयित दाखल आहेत. विदर्भात नागपूरसह अकोला, वर्धा, सेवाग्राम व आता अमरावतीमध्ये चाचण्या होऊ लागल्या आहेत. परंतु संशयितांची संख्या वाढत चालल्याने प्रयोगशाळांवर तपासणीचा दबावही वाढला आहे. ‘आरटी-पीसीआर’ यंत्रावर चाचणी करण्यासाठी एका फेरीला साधारण चार तासांवर वेळ लागतो. परंतु रेड झोनमधील संशयित मृत्यू, अशा झोनमधून प्रसूतीसाठी वेळेवर आलेली संशयित गर्भवती, संशयित मृत्यू व ‘ सिव्हिअरली अ­ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणजे ‘सारी’च्या रुग्णांची तातडीने तपासणी होणे गरजेचे असते, किंवा एखाद्या संशयित इमर्जन्सी रुग्णाच्या चाचणीचा अहवाल लवकर मिळणे गरजेचे असते, अशावेळी ‘ट्रूनॅट बिटा कोविड टेस्ट’ महत्त्वाची ठरते. या चाचणीला ‘आयसीएमआर’ने मंजुरी दिली आहे. केंद्राच्या वतीने नागपूर विभागाला १८ ‘ट्रूनॅट’ यंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील नऊ यंत्रे मंगळवारी उपलब्ध झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात येणारी नऊ यंत्रे भंडारा, नागपूर मनपा, वर्धा, चंद्रपूर मनपा व इतरही जिल्ह्यांना मिळणार आहेत.

-या यंत्रावर पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्याची पुन्हा तपासणी
साधारण केवळ ४० मिनिटात ‘ट्रूनॅट’ यंत्रावर कोरोना चाचणीचा अहवाल मिळणार असल्याने जास्तीत जास्त नमुने तपासणी शक्य होणार आहे. आरोग्य यंत्रणेला पुढील नियोजन करणे शक्य होणार आहे. या यंत्रावर निगेटिव्ह आलेला अहवाल हा १०० टक्के असणार आहे, परंतु अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित नमुन्याची ‘आरटी-पीसीआर’ यंत्रावर पुन्हा तपासणी करणे आवश्यक असणार आहे.

-डागा रुग्णालयात लागणार यंत्र
नागपूर सेवा मंडळाअंतर्गत नागपूर मनपा व जिल्हा, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्याला प्रत्येकी एक ‘ट्रूनॅट’ यंत्र उपलब्ध झाले आहे. या यंत्रावर तासाभरात अहवाल प्राप्त होत असल्याने संशयित इमर्जन्सी रुग्णांची चाचणी होऊन त्यांना तातडीने पुढील उपचार मिळतील. नागपुरात हे यंत्र डागा शासकीय स्त्री रुग्णालयात स्थापन केले जाईल.
-डॉ. संजय जयस्वाल
उपसंचालक, आरोग्य सेवा मंडळ, नागपूर

 

Web Title: Corona test now in 40 minutes; The state will get 79 TruNet machines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.