कोरोना लस झाली म्हातारपणाची काठी; ज्येष्ठांमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 11:09 AM2021-03-02T11:09:26+5:302021-03-02T11:09:50+5:30

Nagpur news सोमवारी नागपूर जिल्ह्यात ६० वर्षांवरील ७०२ तर ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या ४७ लाभार्थ्यांनी लस घेतली.

Corona vaccinated stick of old age; Enthusiasm among seniors | कोरोना लस झाली म्हातारपणाची काठी; ज्येष्ठांमध्ये उत्साह

कोरोना लस झाली म्हातारपणाची काठी; ज्येष्ठांमध्ये उत्साह

googlenewsNext
ठळक मुद्दे: ६० वर्षांवरील ७०२ तर, ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या ४७ लाभार्थ्यांनी घेतली लस

लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : कोरोना प्रतिबंधक आता म्हातारपणाची काठी झाल्याने ज्येष्ठांनी लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील ११ ही केंद्रांवर गर्दी उसळली, परंतु नियोजन फसल्याने लसीकरण कमी झाले. सोमवारी नागपूर जिल्ह्यात ६० वर्षांवरील ७०२ तर ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या ४७ लाभार्थ्यांनी लस घेतली. शहराच्या तुलनेत ग्रामीणमधील १२ केंद्रावर लसीकरण कमी झाले. मंगळवारपासून या संख्येत दुप्पटीने वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. कोरोना आणीबाणीच्या काळात रुग्णसेवा देणाऱ्या ‘हेल्थ वर्कर’ला यात प्राधान्य देण्यात आले. १३ फेब्रुवारीपासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. यात ‘दुसरा डोस’ देण्यासोबतच ‘फ्रंट लाइन हेल्थ वर्कर’च्या लसीकरणाला सुरुवात झाली. तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांपेक्षा अधिक आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटांतील गंभीर आजार (को-मॉर्बिडिटीज) असलेल्यांचा समावेश करून १ मार्चपासून त्यांचे लसीकरण हाती घेण्यात आले. शहरात ११ तर ग्रामीण भागातील १२ केंद्रावर थेट लसीकरणाची सोय करण्यात आली. पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याने नियोजनातील उणिवा सामोर आल्या, परंतु लसीकरण करून घेण्याचा उत्साह ज्येष्ठांमध्ये कायम होता.

-शहरात ५७५ ज्येष्ठांनी घेतली लस

शहरात ‘को-मॉर्बिडिटीज’असलेल्या ४५ ते ६० वर्षे वयोगटांतील ३२ लाभार्थ्यांनी लस घेतली. विशेष म्हणजे, ११ केंद्रांपैकी केवळ ५ केंद्रांवरच यांचे लसीकरण झाले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ‘अ’ केंद्रावर ९, मनपाच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये १, मनपाचा पाचपावली महिला हॉस्पिटलच्या ‘अ’ केंद्रावर ३, ‘ब’ केंद्रावर १२ तर मेडिकलच्या ‘अ’ केंद्रावर ७ लाभार्थ्यांनी लस घेतली. ६० वर्षांवरील ४१७ ज्येष्ठांनी लस घेतली. सर्वाधिक ज्येष्ठांचे लसीकरण मनपाचा इंदिरा गांधी रुग्णालयात झाले. येथे ५७५ ज्येष्ठांनी लस घेतली. त्यानंतर, मेयोचा ‘ब’ केंद्रावर १५४, ‘अ’ केंद्रावर ४, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) केंद्रावर ११२, मेडिकलच्या ‘अ’ केंद्रावर ७५, डागा हॉस्पिटलच्या केंद्रावर २९, आयसोलेशन हॉस्पिटलचा केंद्रावर २२ तर कामगार विमा रुग्णालयाच्या केंद्रावर ११ लाभार्थ्यांनी लस घेतली.

-ग्रामीणमध्ये १२७ ज्येष्ठांना लस

ग्रामीणमधील १२ केंद्रांवर १२७ ज्येष्ठांनी तर ‘को-मॉर्बिडिटीज’असलेल्या ४५ वर्षांवरील १५ लाभार्थ्यांनी लस घेतली. केवळ पाच केंद्रांवर ‘को-मॉर्बिडिटीज’न लस देण्यात आली. ६० वर्षांवरील लसीकरणात काटोल ग्रामीण रुग्णालयात २८, उमरेड ग्रामीण रुग्णालयांत २, पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात २, सावनेर उपजिल्हा रुग्णालयात ४७, भिवापूर ग्रामीण रुग्णालयात १, रामटेक उपजिल्हा रुग्णालयात १३, कामठी उपजिल्हा रुग्णालयात २१, कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात ६, हिंगणा ग्रामीण रुग्णालयात २, मौदा ग्रामीण रुग्णालयात १, तर नरखेड ग्रामीण रुग्णालयात ४ लाभार्थ्यांना लस दिली.

-आजपासून ५ खासगी हॉस्पिटलमध्येही लसीकरण

मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, शहरातील ५ खासगी हॉस्पिटलमध्ये मंगळवार २ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण होणार आहे. यात लता मंगेशकर हॉस्पिटल सीताबर्डी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल, मोगरे चाइल्ड केअर हॉस्पिटल, मेडिकेअर हॉस्पिटल व आयकॉन हॉस्पिटलचा समावेश आहे. शहरात ३० खासगी हॉस्पिटलनाही लसीकरणासाठी अधिकृत करण्यात आले आहे, परंतु लसीकरण शुल्काला घेऊन स्थिती स्पष्ट न झाल्याने थांबविण्यात आले आहे.

- खासगी हॉस्पिटलमध्ये एका डोससाठी २५० रुपये शुल्क

खासगी हॉस्पिटलमध्ये एका डोससाठी ज्येष्ठ नागरिकांकडून २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. केंद्र सरकारने प्रति डोज व्यक्ती १५० रुपये दर ठरवून दिला आहे. खासगी हॉस्पिटल प्रति डोस प्रतिव्यक्ती १०० रुपये अतिरिक्त आकारण्याची मुभा असणार आहे. २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाईल. ‘को-विन’ अ‍ॅपवर नोंदणी केल्यानंतरच लस दिली जाईल. शासकीय केंद्रावर नि:शुल्क लस देण्यात येईल, असेही डॉ.चिलकर यांनी सांगितले.

Web Title: Corona vaccinated stick of old age; Enthusiasm among seniors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.