Corona vaccine : पती पाठोपाठ पत्नीचीही प्राणज्योत मावळली, लोणारे कुटुंबावर नियतीचा घाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 10:08 PM2021-05-05T22:08:06+5:302021-05-05T22:09:05+5:30
पती निघून गेल्याची बाब सुद्धा पत्नीला होऊ देण्यात आली नाही. प्रकृती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच नागपूरला हलविण्यात आले. परंतु नियतीला ते मान्य नसावे. शर्तीचे प्रयत्न करुन मंगळवारी (दि.४) रात्री ११.३० वाजता पत्नीची प्राणज्योत मालवली.
बोंडगावदेवी - घरामध्ये आनंदीमय वातावरणात अल्पश: आजारानी पती-पत्नीला घेरले. दोघांवर औषध उपचार सुरु होता. पतीला शहराच्या ठिकाणी औषधोपचार सुरु असताना नियतीने घाला घातला. अखेर पतीने मृत्यूला कवटाळले. पत्नी अंथरुणावर पडली. पती निघून गेल्याची बाब सुद्धा पत्नीला होऊ देण्यात आली नाही. प्रकृती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच नागपूरला हलविण्यात आले. परंतु नियतीला ते मान्य नसावे. शर्तीचे प्रयत्न करुन मंगळवारी (दि.४) रात्री ११.३० वाजता पत्नीची प्राणज्योत मालवली. पाच दिवसाच्या अंतराने पतीच्या पाठोपाठ पत्नीचेही निधन झाल्याने लोणारे परिवारावर दुखाचे डोंगर कोसळले.
येथील रहिवासी असलेले सिद्धार्थ मुखलता लोणारे हे नोकरी निमित्ताने वडसा येथे राहत होते. दोन वर्षापुर्वीच ते प्राचार्य पदावरुन सेवानिवृत्त झाले होते. पत्नी सरोज मुलगा निलेश, मुलगी स्नेहल यांच्यासोबत आनंदाने राहत होते. मुलगा व मुलगी शिक्षणासाठी आई-वडीलांपासून दूर राहत होते. बोंडगावदेवी या आपल्या जन्मगावी पत्नीसह येण्याचा त्यांचा नित्यनेम होता. मित्र परिवार नातलग यांच्या कार्यक्रमात त्यांची आवर्जुन उपस्थिती राहायची. कोरोना महामारीच्या संक्रमणात क्रुर काळाने घाला घातला. पती-पत्नी दोघांचीही प्रकृती बिघडली. सिद्धार्थ लोणारे यांच्यावर गडचिरोली येथे औषधोपचार सुरु असताना ३० एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले.
सज्ञान असलेल्या निलेश या मुलाने वडीलाच्या निधनाची माहिती आईला होऊ दिली नाही. पती दुरुस्त होऊन घरी येतील अशी आशा पत्नी सरोज करीत होती. पत्नी आजाराने ग्रस्त होती. आईची प्रकृती बरी व्हावी म्हणून मुलाने डॉक्टरच्या सल्ल्याने आईच्या उपचारावर भर दिला. परंतु नियतीला हे मान्य नसावे. प्रकृतीत सुधारणा न होता खालावत गेली. नागपूरला हलविण्यात आले. अखेर ४ मे रोजी रात्री ११.३० वाजता सरोज सिद्धार्थ लोणारे यांनी अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थ (६०) सरोज (५०) या पती-पत्नीच्या एकाएकी निधनाने लोणारे परिवारावर दुखाचे सावटच कोसळले. सज्ञान असलेल्या दोन्ही बहिण भावांचे आधारवड हरपले.