पालकमंत्र्यांनी घेतली कोरोना लस ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:07 AM2021-03-14T04:07:26+5:302021-03-14T04:07:26+5:30

नागपूर : पालकमंत्री नितीन राऊत यांनी शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कामठी रोड येथे ...

Corona vaccine taken by Guardian Minister () | पालकमंत्र्यांनी घेतली कोरोना लस ()

पालकमंत्र्यांनी घेतली कोरोना लस ()

Next

नागपूर : पालकमंत्री नितीन राऊत यांनी शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कामठी रोड येथे जाऊन लस घेतली. या वेळी त्यांच्या पत्नी सुमेधा राऊत, अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक राजेंद्र करवाडे, महाराष्ट्र विभागाचे समन्वयक राजेश लाडे त्यांच्यासोबत होते. त्यांनाही या वेळी लस देण्यात आली. नागपूर येथे रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम रुग्णालयाचा फेरफटका मारला. या वेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांसोबत त्यांनी चर्चा केली. लस घेऊन परत जाताना आपल्या परिसरातील नागरिकांनाही या उपक्रमांमध्ये सहभागी करा, नागपुरातील प्रत्येक नागरिकाला ही लस टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. या वेळी उपस्थित सर्व डॉक्टरांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर लसीकरण विभागाच्या अतिरिक्त कक्षाचेदेखील त्यांनी फीत कापून उद्घाटन केले.पालकमंत्री राऊत यांना यापूर्वी कोरोना संसर्ग होऊन गेला आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना ही लस देण्यात आली.

Web Title: Corona vaccine taken by Guardian Minister ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.