तीन टप्प्यात देणार कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:26 AM2020-12-16T04:26:12+5:302020-12-16T04:26:12+5:30
कोविड-१९ च्या लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी झाल्या आहेत. लसीकरणाची प्रक्रिया कधीही सुरू होऊ शकते. त्यासाठी शहरातील संपूर्ण ...
कोविड-१९ च्या लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी झाल्या आहेत. लसीकरणाची प्रक्रिया कधीही सुरू होऊ शकते. त्यासाठी शहरातील संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहावे, असे आवाहन राधाकृष्णन बी. यांनी नागरी टास्क फोर्स समितीच्या बैठकीत केले. अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार, अतिरिक्त सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, सर्व्हिलेन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद खान, टाटा ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. टिकेश बिसेन यांच्यासह टास्क फोर्स समितीचे सदस्य उपस्थित होते.
....
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
साजीद खान यांनी कोविड लसीकरणासंदर्भातील तयारी कशी असावी, याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. पहिल्या टप्प्यात शहरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण
१९ डिसेंबला असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात लसीकरण मोहिमेत सहभागी होणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘कोव्हीन’ॲपबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
...
१७ जानेवारीला पल्स पोलिओ मोहीम
भारत देश पोलिओमुक्त झाला आहे. यापुढेही देशात पोलिओचा शिरकाव होऊ नये, यासाठी दरवर्षी पोलिओ अभियान राबविण्यात येते. १७ जानेवारी २०२१ रोजी पोलिओ अभियान राबविण्यात येणार असून, त्या दिवशी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोज पाजण्यात येणार आहे.