Corona Virus : नागपुुरातील २० टक्के लहान मुलांमध्ये वाढल्या अ‍ॅण्टिबॉडीज, सिरो सर्वेक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 06:50 AM2021-06-08T06:50:34+5:302021-06-08T06:52:49+5:30

Corona Virus : लसीकरणाअगोदरच २० टक्के मुलांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज निर्माण झाल्याने यावर आणखी सखोल अभ्यास व्हावा, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Corona Virus: Antibodies increased in 20% of children in Nagpur, CERO survey | Corona Virus : नागपुुरातील २० टक्के लहान मुलांमध्ये वाढल्या अ‍ॅण्टिबॉडीज, सिरो सर्वेक्षण 

Corona Virus : नागपुुरातील २० टक्के लहान मुलांमध्ये वाढल्या अ‍ॅण्टिबॉडीज, सिरो सर्वेक्षण 

googlenewsNext

- सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात  येत असल्याच्या पार्श्वभूमीवर लसीकरण चाचणीला सुुरुवात झाली आहे. यात शहरातील पालकांसाठी एक दिलासा देणारी बाब समोर आली आहे. लसीकरण चाचणीसाठी निवडण्यात आलेल्या १२ ते १८ वयोगटातील ५० पैकी १० मुलांच्या शरीरात प्रतिपिंडाची (अ‍ॅण्टिबॉडीज) निर्मिती झाल्याचे आढळून आले आहे. 
लसीकरणाअगोदरच २० टक्के मुलांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज निर्माण झाल्याने यावर आणखी सखोल अभ्यास व्हावा, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
 लहान मुलांवरील लसीकरणासाठी राज्यात पहिल्यांदाच नागपुरात बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या पुढाकारात १२ ते १८ या वयोगटात कोव्हॅक्सिन लसीच्या चाचणीला रविवारपासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ५० सुदृढ मुलांची निवड करण्यात आली. त्यांच्या रक्ताची तपासणी केली असता, १० मुलांमध्ये ॲण्टिबॉडीज वाढल्याचे दिसून आले. यामुळे डॉक्टरांच्या पथकालाही आश्चर्य वाटले. निवड झालेली मुले सुखवस्तू घरातील आहेत. त्यांच्या घरातील जवळच्या व्यक्तीला संसर्ग झालेला नाही. शिवाय, मागील दोन महिन्यांत मुलांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत, हे विशेष. 
मुलांमधील अ‍ॅण्टिबॉडीजचा 
अभ्यास होणे महत्त्वाचे
लहान मुलांवरील मानवी 
चाचणीत ५० मधून १० मुलांमध्ये ॲण्टिबॉडीज वाढल्याचे दिसून 
आले आहे. ही एक मोठी संख्या आहे. यामुळे याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. यांना त्यांच्या नातेवाइकांकडून किंवा इतर मुलांकडून लागण झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे, असे बालरोगतज्ज्ञ 
डॉ. वसंत खळतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

    झोपडपट्टीतील लोकांमध्ये वाढल्या अ‍ॅण्टिबॉडीज  
- विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने नागपूर जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० मध्ये सिरो सर्वेक्षण करण्यात आले. 
- यात शहरातील ४९.७ टक्के, तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांच्या शरीरात अ‍ॅण्टिबॉडीज निर्माण झाल्याचे समोर आले होते. विशेषत: झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांमध्ये ॲण्टिबॉडीज तयार होण्याचे प्रमाण सामान्य व पॉश वसाहतीत राहणाऱ्या लोकांपेक्षा तिप्पट होते.

Web Title: Corona Virus: Antibodies increased in 20% of children in Nagpur, CERO survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.