Corona virus : देवेंद्र फडणवीसांनी मन जिंकलं, 100 अनाथ बालकांचं पालकत्व स्विकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 11:12 AM2021-05-28T11:12:50+5:302021-05-28T11:16:38+5:30

Corona virus : नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी हे श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टचे प्रमुख असून सामाजिक कार्यासाठी ही संस्था काम करते. सध्या कोरोना महामारीमुळे सर्वत्र विदारक परिस्थिती आहे.

Corona virus : Devendra Fadnavis won hearts, accepted custody of 100 orphans in nagpur | Corona virus : देवेंद्र फडणवीसांनी मन जिंकलं, 100 अनाथ बालकांचं पालकत्व स्विकारलं

Corona virus : देवेंद्र फडणवीसांनी मन जिंकलं, 100 अनाथ बालकांचं पालकत्व स्विकारलं

Next
ठळक मुद्दे. संस्थेच्या या संपूर्ण कार्यामध्ये तुम्हाला जी मदत लागेल ती मी करेनच. पण, आज नोंदणी झालेल्या 100 बालकांच्या पालकत्वाची जबाबदारी मी घेतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.

मुंबई - नागपूरमधील श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सोबत’ हा उपक्रम राबवण्यात आला. कोरोना महामारीच्या संकटात आई-वडील गमावलेल्या 100 मुलांना आधार देण्याचं काम या ट्रस्टद्वारे करण्यात येत आहे. या संस्थेच्या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलविण्यात आलं होतं. यावेळी, बोलताना देवेंद्र फडणवीसांनी पहिल्याच दिवशी नोंदणी झालेल्या 100 अनाथ मुलांचं पालकत्व स्विकारलं आहे. आपल्या या निर्णयामुळे त्यांनी लाखोंचं मन जिंकलं आहे. 

नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी हे श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टचे प्रमुख असून सामाजिक कार्यासाठी ही संस्था काम करते. सध्या कोरोना महामारीमुळे सर्वत्र विदारक परिस्थिती आहे. या संकटात अनेकांनी आपल्या आप्तेष्ठांना गमावलंय. आपले आई-वडिल गमावल्याने कित्येकजण अनाथ झाले आहे. या अनाथ मुलांसांठी ट्रस्टच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला. सोबत या उपक्रमाच्या माध्यमातून अनाथांना मायेची ऊब देण्याचं काम या संस्थेद्वारे होत आहे.  

देवेंद्र फडणवीस यांनी संस्थेत नोंदणी झालेल्या मुलांची संपूर्ण जबाबदारी घेती आहे. संस्थेच्या या संपूर्ण कार्यामध्ये तुम्हाला जी मदत लागेल ती मी करेनच. पण, आज नोंदणी झालेल्या 100 बालकांच्या पालकत्वाची जबाबदारी मी घेतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. या कामासाठी सिस्टीम तुम्ही लावायचीय, पण जे पाठबळ लागेल ते निश्चितपणे मी देईल. 

तसेच, कुणाला हा विचार संकुचित वाटेल. पण मी ही एक लोकप्रतिनिधी आहे. मलाही मतदारसंघ आहे. त्यामुळे, दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील जेवढे अशा प्रकारचे लोकं असतील, तुमच्याकडे त्यांची नोंदणी होईल. त्या सर्वांचा खर्चही माझ्यावतीने मी तुम्हाला देईन. त्यासोबत, आपण सांगाल तिथे, सांगाल त्या व्यक्तीस भेटायला यायची माझी तयारी आहे. आपण सांगाल त्या दानशूर व्यक्तींना भेटून अनेकाचं पालकत्व स्विकारण्याचं आवाहन करण्यासाठी मी सदैव संस्थेसोबत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: Corona virus : Devendra Fadnavis won hearts, accepted custody of 100 orphans in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.