Corona virus : गायिका कनिका कपूर प्रकरणाची झळ : खासदार तुमाने सेल्फ आयसोलेशनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 01:02 AM2020-03-22T01:02:07+5:302020-03-22T01:03:08+5:30
गायिका कनिका कपूर प्रकरणाची झळ नागपूरपर्यंत पोहोचली आहे. खासदार तुमाने यांनी जनहितार्थ स्वत:ला ‘सेल्फ आयसोलेशन’मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ते १४ दिवसांपर्यंत खरीच ‘होम क्वॉरंटाईन’ राहतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गायिका कनिका कपूर प्रकरणाची झळ नागपूरपर्यंत पोहोचली आहे. कनिकाच्या कार्यक्रमात सामील झालेले खासदार दुष्यंत सिंह ज्या खासदारांच्या संपर्कात आले, त्यात रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचाही समावेश आहे. दुष्यंत यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तरीही खबरदारी म्हणून खासदार तुमाने यांनी जनहितार्थ स्वत:ला ‘सेल्फ आयसोलेशन’मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ते १४ दिवसांपर्यंत खरीच ‘होम क्वॉरंटाईन’ राहतील.
खा. तुमाने यांनी सांगितले की, ते संसदीय कमिटीच्या त्या बैठकीत सहभागी झाले होते ज्या बैठकीत खा. दुष्यंत सिंहसुद्धा होते. कनिका कपूर या कोरोना विषाणू पॉझिटिव्ह आल्यानंतर ही बाब उघडकीस आली की, त्यांच्या कार्यक्रमात खा. दुष्यंत सिंह हेसुद्धा उपस्थित होते. संसदीय कमिटीच्या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रयान यांनी ही माहिती मिळताच स्वत:ला ‘आयसोलेट’ करून घेतले. त्याचप्रकारे खा. तुमाने यांनीसुद्धा ‘सेल्फ आयसोलेशन’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्र्यांना दिली माहिती
खा. तुमाने यांनी स्वत: ‘सेल्फ आयसोलेशन’ची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करीत त्यांना स्वत:ची काळजी घेण्यास सांगितल्याची माहितीही खा. तुमाने यांनी दिली.