Corona Virus : हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील ९०० उद्योगांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 01:22 AM2020-06-27T01:22:23+5:302020-06-27T01:23:52+5:30

विशेष मोहिमेंतर्गत हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील ९०० उद्योगांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये ज्या उद्योगांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजनांची तंतोतंत अंमलबजावणी केलेली नाही अशा उद्योगांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. ९० अधिकाऱ्यांच्या पथकांनी तपासणी केली.

Corona Virus: Inspection of 900 industries in Hingana and Butibori industrial estates | Corona Virus : हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील ९०० उद्योगांची तपासणी

Corona Virus : हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील ९०० उद्योगांची तपासणी

googlenewsNext
ठळक मुद्देनियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : ९० अधिकाऱ्यांचे पथक

 लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : विशेष मोहिमेंतर्गत हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील ९०० उद्योगांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये ज्या उद्योगांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजनांची तंतोतंत अंमलबजावणी केलेली नाही अशा उद्योगांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. ९० अधिकाऱ्यांच्या पथकांनी तपासणी केली.
कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना व शासनाच्या निर्देशाचे पालन करण्याचे आवाहन उद्योजकांना करण्यात आले आहे. ही तपासणी मोहीम कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होईस्तो सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरी आणि ग्रामीण भागात होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात चिंता वाढली आहे. हिंगणा आणि बुटीबोरी औद्योगिक वसाहत ग्रामीण भागात येतात. हिंगणा औद्योगिक वसाहतीतील तीन उद्योगातील कामगारांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. त्याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार २० ते २४ जूनदरम्यान दोन्ही औद्योगिक वसाहतीतील उद्योगाची तपासणी करण्यात आली. उद्योगांमध्ये शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजनांचे पालन होते किंवा नाही याबाबत तपासणी करण्याबाबत विशेष मोहीम हाती घेतली आहे.

शासनाची निर्देशित नियमावली खालीलप्रमाणे :
कामाचे ठिकाणी मास्क किंवा फेस कव्हर घालणे
प्रवेशद्वार, सभेचे हॉल, मोकळी जागा, व्हरांडा, भिंती, यंत्रसामग्री, लिफ्ट, वॉशरूम, टॉयलेट, जेवणाची जागा इत्यादींचे दररोज निर्जंतुकीकरण करणे
कामगाराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल स्कॅनिंग सुविधा ठेवणे
वारंवार हात धुण्याची व्यवस्था व सॅनिटायझरची सुविधा
गैरहजर असणाऱ्या कामगारांचा तपशील ठेवणे
गैरहजर असल्यास त्याच्या कारणाचा तपशील ठेवणे
सामाजिक अंतर पाळणे
कामगारांच्या जेवणाच्या वेळा विभागून देणे
लिफ्टचा २ ते ४ व्यक्तींकरिताच वापर करणे
लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करणे
तंबाखू, गुटखा याच्या वापरावर बंधन ठेवणे

Web Title: Corona Virus: Inspection of 900 industries in Hingana and Butibori industrial estates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.