CoronaVirus in Nagpur : दोन दिवसात १०९ मृत्यू, ४,३३३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 11:51 PM2021-03-30T23:51:24+5:302021-03-30T23:52:38+5:30

Corona virus, Nagpur news मागील दोन दिवसात ४,३३३ रुग्ण व १०९ रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांची एकूण संख्या २,२३,१५३ तर, मृतांची संख्या ५,०४० झाली.

Corona virus in Nagpur: 109 deaths in two days, 4,333 patients | CoronaVirus in Nagpur : दोन दिवसात १०९ मृत्यू, ४,३३३ रुग्ण

CoronaVirus in Nagpur : दोन दिवसात १०९ मृत्यू, ४,३३३ रुग्ण

Next
ठळक मुद्देरुग्ण वाढत असताना चाचण्या कमी : केवळ ४ हजारांवर चाचण्या

 लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : कोरोनाचे रुग्ण व मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत असताना धुळवडीच्या दिवशी मनपाने आपले चाचणी केंद्र बंद ठेवले. केवळ मेयो, मेडिकल व खासगी प्रयोगशाळेतच तपासण्या झाल्या. परिणामी, इतर दिवशी १६ ते १७ हजारांवर जाणाऱ्या दैनंदिन चाचण्या, सोमवारी केवळ ४,६०४ झाल्या. सुटीच्या दिवशी खासगी लॅब सुरू राहू शकते तर, मग शासकीय का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचा परिणाम, रुग्णसंख्येवर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मागील दोन दिवसात ४,३३३ रुग्ण व १०९ रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांची एकूण संख्या २,२३,१५३ तर, मृतांची संख्या ५,०४० झाली.

नागपूर जिल्ह्यात रविवारी १२,०८९ चाचण्या झाल्या. यातून ३,१७७ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर, ५५ रुग्णांचे बळी गेले. २६०० रुग्णांनी कोरोनावर मात केली. सोमवारी ४६०४ चाचण्या झाल्या. डिसेंबरनंतर पहिल्यांदाच एवढ्या कमी संख्येत चाचण्या झाल्या. यात ४३६९ आरटीपीसीआर तर , २३५ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. शहरात एकूण २६३७, ग्रामीणमध्ये १९६७ चाचण्या झाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव जोरावर असताना चाचण्यांची संख्या कमी होणे धोकादायक ठरू शकत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कमी चाचण्यांमुळे रुग्णसंख्येतही घट आली असली तरी मृत्यूदर २.२५ टक्के कायम आहे. ५४ रुग्णांचे बळी गेले. विशेष म्हणजे, सलग चार दिवसांपासून मृत्यूची संख्या ५० वर जात आहे.

शहरात ३१, ग्रामीणमध्ये २० मृत्यू

सोमवारी शहरात ३१, ग्रामीणमध्ये २० तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांमध्ये शहरातील ६९४, ग्रामीणमधील ४५९ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्णांचा समावेश होता. आतापर्यंत शहरात १,७५,६७६ तर ग्रामीणमध्ये ४६,४४५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. एकूण मृतांमध्ये शहरातील ३,२१५ तर ग्रामीणमधील ९७५ मृत्यू आहेत.

कोरोनाचे ३८,२०९ रुग्ण सक्रिय

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे ३८,२०९ रुग्ण सक्रिय आहेत. यातील ३२,०७३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ६,१३६ रुग्ण विविध रुग्णालयांत व कोविड केअर सेंटरमध्ये भरती आहेत. सोमवारी मेडिकलमध्ये कोविडचे ४९०, मेयोमध्ये ५१५ तर एम्समध्ये ५६ रुग्ण भरती होते.

३० दिवसांत ७३,३६५ रुग्ण, ७०५ मृत्यू

कोरोनाच्या या एक वर्षाच्या कालावधीत सप्टेंबर महिन्यात रुग्ण व मृत्यूची संख्या सर्वाधिक होती. या महिन्यात ४५,१९९ रुग्ण १,४०६ मृत्यूची नोंद झाली होती. परंतु मागील ३० दिवसांतील रुग्णसंख्येने सप्टेंबरमधील रुग्णसंख्येला मागे टाकले. ७३,३६५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर, ७०५ रुग्णांचे मृत्यू झाले. पुढील काही दिवसांत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर २०२० : ४५,१९९ रुग्ण : १४०६ मृत्यू

मार्च २०२१ : ७३,३६५ रुग्ण : ७०५ मृत्यू

(३० मार्चपर्यंत)

कोरोनाची स्थिती

दैनिक चाचण्या : ४,६०४

ए. बाधित रुग्ण :२,२३,१५३

सक्रिय रुग्ण : ३८,२०९

बरे झालेले रुग्ण : १,७९,९०४

ए. मृत्यू : ५,०४०

Web Title: Corona virus in Nagpur: 109 deaths in two days, 4,333 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.