CoronaVirus in Nagpur : नागपूर जिल्ह्यात कोरोनाने १२ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 09:59 PM2020-10-28T21:59:06+5:302020-10-28T22:01:59+5:30

Corona Positive cases dcreased, nagpur news नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत आहे. बुधवारी कोरोनाचे ३४२ नवीन रुग्ण आढळून आले, तर १२ जणांचा मृत्यू झाला तसेच ४५८ जण बरे झाले.

Corona virus in Nagpur: 12 deaths due to corona in the district | CoronaVirus in Nagpur : नागपूर जिल्ह्यात कोरोनाने १२ मृत्यू

CoronaVirus in Nagpur : नागपूर जिल्ह्यात कोरोनाने १२ मृत्यू

Next

३४२ नवीन पॉझिटिव्ह, ४५८ झाले बरे

 

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत आहे. बुधवारी कोरोनाचे ३४२ नवीन रुग्ण आढळून आले, तर १२ जणांचा मृत्यू झाला तसेच ४५८ जण बरे झाले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा जास्त असल्याने बरे होण्याचे प्रमाण ९१.७३ टक्क्यावर पोहोचले आहे. आतापर्यंत एकूण ८६,७५१ जण बरे झालेले आहेत.

आज आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये शहरातील २१३, ग्रामीणमधील १२६ आणि जिल्ह्याबाहेरचे ३ आहेत. यासोबतच एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९४,५७५ वर पोहचली आहे. आज झालेल्या मृत्यूमध्ये शहरातील ६, ग्रामीणमधील ३ आणि जिल्ह्याबाहेरचे ३ आहेत. आतापर्यंत एकूण ३,०९७ मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात मागच्या २४ तासात ५,४६४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील ४,१०५ व ग्रामीणमधील १३५९ आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६ लाख १७ हजार ७८४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ३ लाख ३४ हजार ७०६ आरटी-पीसीआर टेस्ट आणि २ लाख ८३ हजार ७८ ॲन्टिजन टेस्ट करण्यात आल्या.

मागच्या २४ तासात १९९२ नमुन्यांची ॲन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात २३ पॉझिटिव्ह आले. दुसरीकडे खासगी प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या १८५८ नमुन्यांपैकी ११८ पॉझिटिव्ह आले. याशिवाय एम्सच्या प्रयोगशाळेत २९, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ३५, मेयोमध्ये ६०, माफसूमध्ये २१, नीरीत २२ आणि नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत ३४ नमुने पॉझिटिव्ह आले.

ॲक्टिव्ह - ४,७२७

बरे झालेले - ८६,७५१

मृत्यू - ३,०९७

Web Title: Corona virus in Nagpur: 12 deaths due to corona in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.