CoronaVirus in Nagpur : नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा १२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 10:22 PM2020-07-02T22:22:57+5:302020-07-02T22:24:20+5:30

मध्यवर्ती कारागृहातून बुधवारी ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आले असताना गुरुवारी पुन्हा १२ रुग्णांची नोंद झाली तर आज नागपूर जिल्ह्यात ३३ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची संख्या १,६११ वर पोहचली आहे. रविनगर क्वॉर्टरमध्ये पहिल्यांदाच रुग्णाची नोंद झाली असून हा परिसर सील करण्यात आला.

Corona Virus in Nagpur: 12 positive again from Nagpur Central Jail | CoronaVirus in Nagpur : नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा १२ पॉझिटिव्ह

CoronaVirus in Nagpur : नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा १२ पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्दे३३ रुग्णांची भर : रुग्णसंख्या १,६११ : रविनगर क्वॉर्टरमध्ये रुग्णाची नोंद

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मध्यवर्ती कारागृहातून बुधवारी ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आले असताना गुरुवारी पुन्हा १२ रुग्णांची नोंद झाली तर आज नागपूर जिल्ह्यात ३३ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची संख्या १,६११ वर पोहचली आहे. रविनगर क्वॉर्टरमध्ये पहिल्यांदाच रुग्णाची नोंद झाली असून हा परिसर सील करण्यात आला.
नागपूरच्या कारागृहात १ मेपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे ‘टीम ए’ आणि ‘टीम बी’ अशी वर्गवारी करून २१-२१ दिवसांचा कालावधी निश्चित करून व्यवस्थापन करण्यात आले आहे. असे असताना कारागृहात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळतोच कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनस्तरावर चौकशी केली जात असल्याचे समजते. गुरुवारी नीरीच्या प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आलेल्या १२ रुग्णांमध्ये एक ग्रुप टू जेलर महिला अधिकारी, १० कर्मचारी व एक कर्मचाऱ्याची पत्नी आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी सांगितले, कारागृहात साधारण १८०० वर कैदी आहेत. यातील ५५ ते ६० संशयित कैद्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कारागृहात प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचेही ते म्हणाले. कारागृहात आतापर्यंत ६६ अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब पॉझिटिव्ह आले आहेत.

अमरावती येथील पुन्हा एक डॉक्टर पॉझिटिव्ह
मागील आठवड्यात अमरावती येथील एक कोरोनाबाधित महिला डॉक्टर मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये भरती झाली असताना आज पुन्हा एक ३० वर्षीय डॉक्टर मेडिकलमध्ये भरती झाला आहे. विशेष म्हणजे, येथे कोविड हॉस्पिटल असताना रुग्ण नागपुरात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माफसु प्रयोगशाळेतून आज सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे रुग्ण व्हीएनआयटीमध्ये दाखल होते. मेयोच्या प्रयोगशाळेतून काटोल येथून दोन, हिंगणा तालुक्यातून व तामिळनाडू या राज्यातून एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. याच प्रयोगशाळेतून रविनगर येथील पीडब्ल्यूडी क्वॉर्टरमधून एका रुग्णाची नोंद झाली. या क्वॉर्टरमध्ये पहिल्यांदाच रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मेडिकलमधून पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण नाईक तलाव येथील आहेत. लता मंगेशकर प्रयोगशाळेतून एक तर खासगी प्रयोगशाळेतून चार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. खासगी प्रयोशाळेतील रुग्ण वगळता पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे क्वारंटाईन होते.

१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले
मेयोमधून १०, मेडिकलमधून चार व मिलिट्री हॉस्पिटलमधून १४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात मेयोतील हंसापुरी, भोईपुरा, नाईक तलाव-बांगलादेश येथील रुग्ण आहेत. मेडिकलमधील अमरावती, जागृती कॉलनी व नाईक तलाव-बांगलादेश येथील रुग्ण आहेत. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १,२८२ झाली आहे.

संशयित : १,८९६
अहवाल प्राप्त : २५,५६५
बाधित रुग्ण : १,६११
घरी सोडलेले : १,२८२
मृत्यू : २५

Web Title: Corona Virus in Nagpur: 12 positive again from Nagpur Central Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.