CoronaVirus in Nagpur : नागपुरात २८ दिवसांत २० हजार रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 10:46 PM2020-08-28T22:46:25+5:302020-08-28T22:47:29+5:30
कोरोना संसर्गाचा वेग कमालीचा वाढला आहे. गेल्या २८ दिवसात रुग्णांची संख्या २० हजारांवर गेली आहे. शुक्रवारी १३२९ नव्या रुग्णांची भर पडली असून ४२ रुग्णांचे मृत्यू झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गाचा वेग कमालीचा वाढला आहे. गेल्या २८ दिवसात रुग्णांची संख्या २० हजारांवर गेली आहे. शुक्रवारी १३२९ नव्या रुग्णांची भर पडली असून ४२ रुग्णांचे मृत्यू झाले. रोजच्या रुग्णसंख्येत ही मोठी वाढ आहे. बाधितांची एकूण संख्या २६०९४ तर मृतांची संख्या ९४६ झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १०७६, ग्रामीण भागातील २५० तर जिल्हाबाहेरील तीन रुग्ण आहेत. समाधानकारक बाब म्हणजे, आतापर्यंत १५८५५ रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण ६०.७६ टक्क्यांवर गेले आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. गेल्या चार दिवसांपासून रुग्णांची संख्या हजारावर जात आहे. आज नागपूर जिल्ह्यात २८२८ आरटी पीसीआर चाचणी तर ४७७५ रॅपिड अॅन्टिजन असे एकूण ७६०३ चाचण्या करण्यात आल्या. अॅन्टिजन चाचणीत ६३२ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ४१४३ रुग्ण निगेटिव्ह आले. खासगी लॅबमध्ये ४३६ रुग्णांना कोरोना असल्याचे निदान झाले. या शिवाय, एम्समध्ये करण्यात येत असलेल्या आरटीपीसीआर चाचणीत २२, मेडिकलमध्ये ११२, मेयोमध्ये ३३, माफसूमध्ये ७६, नीरीमध्ये १८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज १०९२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले.
या महिन्यात ८२० रुग्णांचा मृत्यू
या महिन्यात तब्बल ८२० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्येच्या तुलनेत ३.६२ टक्के मृत्यू झाले आहेत. आज मृतांमध्ये शहरातील ३४, ग्रामीणमधील पाच तर जिल्हाबाहेरील तीन आहेत. एकूण मृतांमध्ये शहरातील ७१५, ग्रामीण भागातील १३८ तर जिल्हाबाहेरील ९३ मृत्यू आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) आतापर्यंत ३९६, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ४५८, एम्समध्ये १, वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ८, रेडिएन्स हॉस्पिटलमध्ये २८, सेवन स्टार हॉस्पिटलमध्ये ९, होप हॉस्पिटलमध्ये २६, लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये १०, एसएमएचआरसी हॉस्पिटलमध्ये ५, आशा हॉस्पिटलमध्ये ४, हिंगणा वानाडोंगरी येथील सीसीसीमध्ये १ असे एकूण ९४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गृह अलगीकरण कक्षात ५७६३ रुग्ण
लक्षणे नसलेली किंवा सौम्य लक्षणे असलेले कोविड पॉझिटिव्ह रुग्ण कोविड केअर हॉस्पिटलमध्ये न राहता होम आयसालेशन म्हणजे गृह अलगिकरण कक्षात राहण्याला प्राधान्य देत आहेत. सध्याच्या स्थितीत ५७६३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयात ९२९३ रुग्ण उपचार घेत आहेत.
दैनिक संशयित : ७६०३
बाधित रुग्ण : २६०९४
बरे झालेले : १४७६३
उपचार घेत असलेले रुग्ण : ९०९८
मृत्यू :९०४