CoronaVirus in Nagpur : २३४ नवीन पॉझिटिव्ह, तर २९२ झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 11:24 PM2020-11-04T23:24:30+5:302020-11-04T23:26:32+5:30
Corona Virus, 234 new positives, Nagpur news जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे २३४ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर १० जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे २९२ रुग्ण बरे होऊ घरी गेले. आतापर्यंत एकूण ९६,८०१ रुग्ण बरे झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे २३४ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर १० जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे २९२ रुग्ण बरे होऊ घरी गेले. आतापर्यंत एकूण ९६,८०१ रुग्ण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ९३.१८ टक्केवर पोहोचले आहे.
बुधवारी आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील १५१, ग्रामीणचे ८१ आणि जिल्ह्याबाहेरचे २ जण आहेत तर मृतांमध्ये ६ शहरातील, २ ग्रामीणचे आणि २ जिल्ह्याबाहेरचे आहेत. आतापर्यंत एकूण १,०३,८७६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर ३४३९ जणांचा मृत्यू झाला. आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये शहराच्या तुलनेत ग्रामीणचे अधिक होते. ग्रामीणमध्ये २०० आणि शहरातील ९२ जण बरे झाले.
मागील २४ तासात ५५३२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील ४२००, ग्रामीणमधील १३३२ जण आहेत. आतापर्यंत एकूण ६ लाख ५० हजार ९७३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. २५२१ नमुन्यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. यात २१ पॉझिटिव्ह आले. याशिवाय खासगी प्रयोगशाळेत ६६, एम्समधील प्रयोगशाळेत ६, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ३८, मेयोच्या प्रयोगशाळेत ६९, माफसुच्या प्रयोगशाळेत ७, नीरीच्या प्रयोगशाळेत १० आणि नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत १७ नमुने पॉझिटिव्ह आलेत.
ॲक्टिव्ह ३६३६
बरे झालेले - ९६,८०१
मृत - ३४३९