CoronaVirus in Nagpur : ४६५ कोरोना पॉझिटिव्ह, ९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 11:00 PM2021-01-07T23:00:30+5:302021-01-07T23:02:01+5:30

Corona virus , Nagpur news जानेवारीत दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. गुरुवारी ४६५ नव्या रुग्णांची भर पडली तर ९ रुग्णांचा जीव गेला. रुग्णांची एकूण संख्या १,२६,६५४ तर मृतांची संख्या ३,९९३ झाली.

Corona virus in Nagpur: 465 corona positive, 9 deaths | CoronaVirus in Nagpur : ४६५ कोरोना पॉझिटिव्ह, ९ मृत्यू

CoronaVirus in Nagpur : ४६५ कोरोना पॉझिटिव्ह, ९ मृत्यू

Next
ठळक मुद्देमहिनाभरानंतर बाधितांमध्ये पुन्हा वाढ : रुग्णांची संख्या एक लाखावर

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : जानेवारीत दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. गुरुवारी ४६५ नव्या रुग्णांची भर पडली तर ९ रुग्णांचा जीव गेला. रुग्णांची एकूण संख्या १,२६,६५४ तर मृतांची संख्या ३,९९३ झाली. विशेष म्हणजे, ५ डिसेंबर रोजी ५२७ नवे रुग्ण आढळून आले होते, नंतर रुग्णसंख्या कमी झाली होती. परंतु मागील चार दिवसांपासून ४०० वर रुग्णसंख्या जात असल्याने चिंतेचे वातावरण आहे. शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १,००,४४७ वर पोहचली आहे.

नागपूर जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीचे तीन दिवस दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या ५०० वर गेली होती. नंतर ही रुग्णसंख्या कमी होऊन ३५० दरम्यान आली. आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. आज ४,९४० चाचण्या झाल्या. यात ४,३०७ आरटीपीसीआर तर ६३३ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. अँटिजेनमधून ३३ तर आरटीपीसीआर चाचणीतून ४३२ रुग्ण बाधित आढळून आले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ४२३, ग्रामीण भागातील ३९ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ४, ग्रामीणमधील २ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्णांचे मृत्यू आहेत. आज ३३२ रुग्ण बरे झाले असून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १,१८,२८१ वर गेली आहे.

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढतीवर

शहरात ३,२८० तर ग्रामीण भागात ११०० असे एकूण ४,३८० कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील १,४११ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर २,९६९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. २५ डिसेंबर रोजी अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ४०७७ होती. दैनंदिन बरे होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाली आहे. याचे प्रमाण ९३.३९ टक्क्यांवर आले आहे.

दैनिक संशयित : ४,९४०

बाधित रुग्ण : १,२६,६५४

बरे झालेले : १,१८,२८१

उपचार घेत असलेले रुग्ण : ४,३८०

 मृत्यू : ३,९९३

Web Title: Corona virus in Nagpur: 465 corona positive, 9 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.