CoronaVirus in Nagpur : नागपुरात एकाच दिवसात ५९ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 11:09 PM2020-09-09T23:09:55+5:302020-09-09T23:11:11+5:30
नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू बुधवारी नोंदविण्यात आले आहे. ५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
लोकमन न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू बुधवारी नोंदविण्यात आले आहे. ५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यापूर्वी तीन वेळा जिल्ह्यात २४ तासात ५० कोरोना पॉझिटिव्हचा मृत्यू झाला होता. बुधवारी हा आकडा ५९ पर्यंत पोहचला आहे. यापूर्वी २५ ऑगस्ट रोजी ५२ पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू झाले होते. ६ सप्टेंबर रोजी ५४ तर ७ सप्टेंबर रोजी ५० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आज झालेल्या ५९ मृत्यूमध्ये शहरातील ४३ तर जिल्ह्यातील ११ व शहराबाहेरील ५ लोकांचा समावेश आहे. आतापर्यंत १४५८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यात नागपूर शहरातील ११२० तर ग्रामीणच्या २०७ व जिल्ह्याबाहेरील १३१ रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी संक्रमितांची संख्या थोडी घसरली आहे. बुधवारी १३१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. मंगळवारी एकाच दिवसात २२०५ कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. बुधवारी शहरातील ८६४ तर ग्रामीण भागातील ४५० व जिल्ह्याबाहेरील ५ रुग्ण संक्रमित आढळले आहे. आतापर्यंत संक्रमितांची संख्या ४४५५६ झाली आहे. बुधवारी ८३८० नमुने तपासण्यात आले. यात ६४७३ शहरातील व १९०७ ग्रामीण भागातील आहे. आतापर्यंत ३ लाख २० हजार ७७९ नमुन्यांची तपासणी झाली आहे. यात रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट ४२५६ व आरटी-पीसीआर टेस्ट ४१२५ लोकांची झाली आहे.
११०५ रुग्ण झाले कोरोनामुक्त
नागपूर जिल्ह्यात बुधवारी ११०५ कोरोना संक्रमित रुग्ण घरी परतले आहे. नागपूर शहरातील ८७६ व ग्रामीणच्या २२९ रुग्णांचा यात समावेश आहे. आतापर्यंत ३१५६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. कोरोनामुक्त होण्याचा दर ७०.८४ टक्के पर्यंत पोहचला आहे.
खासगी लॅबमधून ५४८ पॉझिटिव्ह
खासगी लॅबमधून गेल्या २४ तासात १२३२ नमुने तपासण्यात आले. त्यातील ५४८ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. यात अॅन्टिजेन टेस्टमध्ये ४३५, एम्सच्या लॅबमध्ये ३७, मेडिकल लॅबमध्ये १६६, मेयो लॅबमध्ये ११३, माफसूच्या लॅबमध्ये १, नीरीच्या लॅबमध्ये १९ नमुने पॉझिटिव्ह आले आहे.
कोरोनाची स्थिती
अॅक्टीव्ह - ११५३२
कोरोनामुक्त - ३१५६६
मृत - १४५८