CoronaVirus in Nagpur : नागपुरात ७१५ पॉझिटिव्ह, ९७९ रुग्ण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 11:39 PM2020-08-24T23:39:25+5:302020-08-24T23:40:42+5:30
रोजच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे. सोमवारी ७१५ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ९७९ रुग्ण बरे झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रोजच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे. सोमवारी ७१५ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ९७९ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णांची एकू ण संख्या २१,१५४ झाली आहे. परंतु मृत्यूची संख्या आजही २५ वर असल्याने काहीसे चिंतेचे वातावरण आहे. आज ३० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, बळींची संख्या ७६२ वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांंमध्ये शहरातील ५८५ तर ग्रामीण भागातील १२७ रुग्ण आहेत.
नागपूर जिल्ह्यात गंभीर रुग्णसंख्येचे वाढते प्रमाण व मृतांच्या संख्येत होत असलेल्या वाढीला उशिरा उपचार हे मुख्य कारण म्हणून समोर आले आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) आज आठ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात छावणी सदर येथील ५० वर्षीय पुरुष, महाकालीनगर मानेवाडा येथील ६८ वर्षीय पुरुष, कामठी गोराबाजार येथील ५५ वर्षीय पुरुष, खरबी येथील ५३ वर्षीय महिला, कामठी मौदा येथील ५४ वर्षीय महिला, जुनी मंगळवारी येथील ६४ वर्षीय पुरुष, जयभीम चौक हिवरीनगर येथील ६६ वर्षीय पुरुष व मोठा ताजबाग येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. मेडिकलसह इतर हॉस्पिटलमधील मृतांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. एकूणच आज शहरात २१, ग्रामीण भागात सहा तर जिल्हाबाहेरील तीन रुग्णांचा मृत्यू झाला.
२०४१अॅन्टिजन चाचणीत ३६३ पॉझिटिव्ह
शहरात १०३७ तर ग्रामीणमध्ये १००४ असे एकूण २०४१ रॅपिड अॅन्टिजन चाचण्या करण्यात आल्या. यात ३६३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. एकूण चाचण्यांच्या तुलनेत रुग्णांचे प्रमाण १७.७८ टक्के आहे. मेयोमध्ये २९७ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या, यात ९४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेडिकलमध्ये ३०२ चाचण्यातून ९३, नीरीमध्ये ३१ चाचण्या केल्या असता सर्वच पॉझिटिव्ह तर खासगी लॅबमध्ये ४०७ चाचण्या केल्या असता १३४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
मेयो, मेडिकल अर्धे रिकामे
मेयो व मेडिकलमधील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ६०० खाटांची सोय असताना अर्ध्या खाटा रिकाम्या आहेत. सध्या मेयोमध्ये ३०५ तर मेडिकलमध्ये ३२१ रुग्ण आहेत. एम्समध्ये ४९ रुग्ण असून, खासगी हॉस्पिटल फुल्ल आहेत. वोक्हार्टमध्ये ४२, रेडिएन्समध्ये ५७, सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये ८४, होप हॉस्पिटलमध्ये ८४, लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ६८, भवानी हॉस्पिटलमध्ये ९०, लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये ५१, आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये ३८, एसएमएचआरसीमध्ये ८२, आशा हॉस्पिटलमध्ये २९ रुग्ण उपचाराखाली आहेत. ५,६६३ रुग्ण होम
आयसोलेशनमध्ये आहेत. आतापर्यंत १२,०३२ रुग्ण बरे झाले असून, ८,३६० रुग्ण उपचाराखाली आहेत.
दैनिक संशयित : ६०,८३८
बाधित रुग्ण : २१,१५४
बरे झालेले : १२,०३२
उपचार घेत असलेले रुग्ण : ८,३६०
मृत्यू : ७६२