CoronaVirus in Nagpur : नागपुरात ११ दिवसात ७२९ रुग्ण; १० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 11:23 PM2020-07-11T23:23:16+5:302020-07-11T23:24:35+5:30

कोरोनाच्या चार महिन्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या ११ दिवसांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ७२९ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात शनिवारी ५५ रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या २,२३४ वर पोहचली, तर मृतांची संख्या ३४ झाली असून आतापर्यंत १,४६८ रुग्ण बरे झाले आहेत.

Corona virus in Nagpur: 729 patients in 11 days in Nagpur; 10 deaths | CoronaVirus in Nagpur : नागपुरात ११ दिवसात ७२९ रुग्ण; १० मृत्यू

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ११ दिवसात ७२९ रुग्ण; १० मृत्यू

Next
ठळक मुद्दे५५ नव्या रुग्णांची भर : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.७ टक्के

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या चार महिन्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या ११ दिवसांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ७२९ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात शनिवारी ५५ रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या २,२३४ वर पोहचली, तर मृतांची संख्या ३४ झाली असून आतापर्यंत १,४६८ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.७ टक्के आहे. या महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. पहिल्या तारखेलाच ७३ रुग्ण पॉझिटिव्ह आले, नंतर सलग तीन दिवस रुग्णसंख्या ४५ ते ५५ च्या दरम्यान होती, तर नंतरचे चार दिवस रुग्णसंख्या २७ ते ७१ रुग्णांच्या दरम्यान होती. सर्वाधिक रुग्णांची नोंद ९ जुलै रोजी झाली. १८३ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर गेल्या दोन दिवसांत १२४ रुग्णांची भर पडली, असे ७२९ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, मृत्यूचे प्रमाणही वाढले. पाच दिवसांत १० मृत्यूची नोंद झाली. एकूण ३४ मृतांमध्ये २२ मृत्यू नागपूर जिल्ह्यातील आहेत तर १२ मृत्यू नागपूरबाहेरील आहेत. शिवाय, अमरावती व अकोला येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू नागपुरात झाला आहे. आज मेयो, मेडिकल व एम्समधून ३८ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १,४६८ झाली आहे. यातील ७३३ रुग्ण मेयो, मेडिकल, एम्स व आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. संस्थात्मक अलगीकरण कक्षात १,७९६ संशयित दाखल आहेत.

७३३ रुग्ण उपचाराखाली
आज मेयोच्या प्रयोगशाळेत १३, मेडिकलच्या प्रयोगशाळेत दोन, नीरीच्या प्रयोगशाळेत २१, खासगी प्रयोगशाळेतून १०, तर रॅपिड अ‍ॅण्टिजन चाचणीतून नऊ रुग्ण असे ५५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेयोमध्ये सध्या ८० रुग्ण उपचार घेत असून ६६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मेडिकलमध्ये १४१ रुग्ण उपचाराखाली असून ६२९ रुग्ण बरे झाले आहेत. १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एम्समध्ये ५५ रुग्णांवर उपचार सुरू असून १४२ रुग्ण बरे झाले आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये २४ रुग्ण उपचार घेत आहेत. कामठी रुग्णालयात ३१, आमदार निवासातील सीसीसीमध्ये १२३, मध्यवर्ती कारागृहातील सीसीसीमध्ये २१५ तर ६४ रुग्ण भरती प्रक्रियेत असून एकूण ७३३ रुग्ण उपचाराखाली आहेत. एकूण २,२३४ रुग्णसंख्येत ३२१ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

संशयित : २,४७८
बाधित रुग्ण : २,२३४
घरी सोडलेले : १,४६८
मृत्यू : ३४

Web Title: Corona virus in Nagpur: 729 patients in 11 days in Nagpur; 10 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.