CoronaVirus in Nagpur : नागपुरात मृतांची संख्या ५०० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:54 PM2020-08-17T22:54:50+5:302020-08-17T22:56:37+5:30

कोरोनाबाधित मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. पाच महिन्यात ५०० वर कोरोनाबाधितांचा जीव गेला आहे. सोमवारी यात २४ रुग्णांच्या मृत्यूची भर पडली. मृतांची संख्या ५१२ वर गेली आहे.

Corona virus in Nagpur: Death toll in Nagpur crosses 500 | CoronaVirus in Nagpur : नागपुरात मृतांची संख्या ५०० पार

CoronaVirus in Nagpur : नागपुरात मृतांची संख्या ५०० पार

Next
ठळक मुद्दे६२३ नव्या रुग्णांची भर, २४ मृत्यू : ग्रामीणमध्ये ८५ तर शहरात ५३८ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधित मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. पाच महिन्यात ५०० वर कोरोनाबाधितांचा जीव गेला आहे. सोमवारी यात २४ रुग्णांच्या मृत्यूची भर पडली. मृतांची संख्या ५१२ वर गेली आहे. विशेष म्हणजे, मागील १७ दिवसात ३८१ मृत्यू झाले आहेत, तर याच महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंदही झाली आहे. आज ६२३ नवे रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या १४,६१३ वर पोहचली आहे. बाधितांमध्ये ग्रामीणमधील ८५ तर शहरातील ५३८ रुग्ण आहेत.
नागपूर जिल्ह्यातील एकूण मृतांमध्ये ग्रामीण भागातील ८२, शहरातील ३६७ तर जिल्हाबाहेरील ६३ मृत्यू आहेत. मेयोमधील मृतांमध्ये संत्रा मार्केटमधील ४५ वर्षीय पुरुष, खापरखेडा येथील २० वर्षीय युवक, शांतिनगर येथील ६८ वर्षीय पुरुष, जबलपूर येथील १७ वर्षीय मुलगी, बजेरिया येथील ६० वर्षीय पुरुष, साईमंदिर परिसर येथील ५६ वर्षीय महिला, हिंगणा रोड येथील ५२ वर्षीय पुरुष, मध्य प्रदेश येथील ६५ वर्षीय पुरुष, मोमीनपुरा येथील ३२ वर्षीय महिला, इतवारी येथील ५० वर्षीय पुरुष, प्रेमनगर येथील ७५ वर्षीय महिला, मानेवाडा दौलतनगर येथील ६८ वर्षीय पुरुष, खलासी लाईन मोहननगर येथील ७७ वर्षीय पुरुष, भारतनगर येथील ५८ वर्षीय पुरुष, जरीपटका येथील ७२ वर्षीय महिला, हजारीपहाड येथील ४४ वर्षीय पुरुष, इतवारी येथील ७३ वर्षीय पुरुष, कळमना येथील ६० वर्षीय महिला, वाडी येथील ३४ वर्षीय महिला, गांजाखेत येथील ७४ वर्षीय महिला, दसरा रोड येथील ६० वर्षीय पुरुष, पार्वतीनगर येथील ६४ वर्षीय पुरुष, बगडगंज येथील ७० वर्षीय महिला, पारडी येथील ६५ वर्षीय महिला, महाल झेंडा चौक येथील ६२ वर्षीय पुरुष व महाल येथील ४३ वर्षीय पुरुष आदींचा समावेश होता. यात काही मृतांची नोंद रविवारी झाली आहे.

अ‍ॅन्टिजन चाचणीत ३१६ पॉझिटिव्ह
रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणीत आज ३१६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. अर्ध्या तासात अहवाल मिळत असल्याने व दहा झोनमध्ये नि:शुल्क व्यवस्था केल्याने याचा फायदा होताना दिसून येत आहे. मेडिकलच्या प्रयोगशाळेत आरटीपीसीआर केलेल्या चाचणीत ७२, मेयोच्या प्रयोगशाळेत ९८, एम्सच्या प्रयोगशाळेत ४४, नीरीच्या प्रयोगशाळेत ४ व खासगी लॅबमध्ये ८९ अशा एकूण ६२३ रुग्णांची नोंद झाली.

होम आयसोलेशनमध्ये २७१४ रुग्ण
कोविड पॉझिटिव्ह असताना लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले २७१४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. ज्यांच्याकडे होम आयसोलेशनची सोय नाही असे ५३७ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये मध्यम व गंभीर लक्षणे असलेले ३३७ रुग्ण आहेत, तर मेडिकलमध्ये ३७७, मेयोमध्ये ३१५, एम्समध्ये ४३ तर कामठी रुग्णालयात १५ रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण ७,१८६ रुग्ण उपचाराखाली आहेत. आज ३७६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६,९१५ झाली आहे.

मृतांचे प्रमाण ३.५० टक्के
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात दोन मृतांची संख्या होती. त्यानंतर मे महिन्यात १२, जून महिन्यात १६ तर जुलै महिन्यात १०१ मृतांची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक म्हणजे ३८१ मृत्यू झाले आहेत. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ३.५० टक्के मृत्यू झाले आहेत. धक्कादायक म्हणजे, भारतात मृत्यूचे प्रमाण १.९३ टक्के तर महाराष्ट्रात ३.३८ टक्के आहे. त्यातुलनेत नागपूर जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे.

दैनिक संशयित : २३८
बाधित रुग्ण : १४,६१३
बरे झालेले : ६,९१५
उपचार घेत असलेले रुग्ण : ७,१८६
मृत्यू : ५१२


महिन्यानुसार मृतांची संख्या
एप्रिल २
मे १२
जून १६
जुलै १०१
ऑगस्ट ३८१

Web Title: Corona virus in Nagpur: Death toll in Nagpur crosses 500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.