CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोना रुग्णांनी गाठली शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 12:24 AM2020-04-25T00:24:08+5:302020-04-25T00:25:29+5:30
विदर्भात नागपूर हे कोरोनाचे केंद्रबिंदू बनले आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) गुरुवारी मध्यरात्री तपासलेल्या नमुन्यात एक, शुक्रवारी तपासलेल्या नमुन्यात चार तर पहिल्यांदाच निरीच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात एक पॉझिटिव्ह आल्याने तसेच अन्य एक ,अशी रुग्णांची संख्या सातवर गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात नागपूर हे कोरोनाचे केंद्रबिंदू बनले आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) गुरुवारी मध्यरात्री तपासलेल्या नमुन्यात एक, शुक्रवारी तपासलेल्या नमुन्यात चार तर पहिल्यांदाच निरीच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात एक पॉझिटिव्ह आल्याने तसेच अन्य एक ,अशी रुग्णांची संख्या सातवर गेली. कोरोना रुग्णाने शंभरी गाठली असून ही संख्या १०५ वर पोहचली आहे. नागपुरसाठी काहीशी दिलासा देणारी बाब म्हणजे, आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मेडिकलमधून सात रुग्ण कोरोनामुक्त झाले. नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत असलीतरी पुणे, मुंबई व नाशिकच्या तुलनेत बाधित रुग्णांची गती कमी आहे. यामुळे शंभरी गाठायला ४४ दिवस लागले. गुरुवारी मध्यरात्री एम्समध्ये मोमीनपुरा येथील ५२वर्षीय पुरुषाचा नमुना पॉझिटिव्ह आला. मोमीनपुरा येथीलच बाधित रुग्णाचा संपर्कात ते आले असल्याचे सांगण्यात येते. एम्स प्रयोगशाळेतच आज तपासलेलया ३४ नमुन्यांमधून चार पॉझटिव्ह आले. यात ३३वर्षीय पुरुष, पाच वर्षीय मुलगा, ३५ व ३३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. हे चारही रुग्ण मोमीनपुरा येथील रहिवासी असून गेल्या काही दिवसांपासून त्यांना वनामती येथे क्वारंटाइन करण्यान आले होते. नीरी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आलेला एक नमुना हा ५० वर्षीय महिलेचा असून ती सतरंजीपुरा येथील रहिवासी आहे. -चार पॉझिटिव्ह रुग्ण गंभीरमेडिकलमध्ये ३५ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यात ८०वर्षीय वृद्धासह आणखी चार रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी यांनी याला दुजोरा दिला आहे. ते व त्यांच्या डॉक्टरांची चमू या रुग्णांकडे लक्ष ठेवून आहेत. तुर्तासतरी या रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडलेली नसल्याचे सांगण्यात येते. उर्वरित रुग्णांमध्ये लक्षणे नसून प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित २२३
दैनिक तपासणी नमुने ७७
दैनिक निगेटिव्ह नमुने ७१
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १०५
नागपुरातील मृत्यू ०१
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण २२
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १२३३
कॉरन्टाईन कक्षात एकूण संशयित ६९४
पीडित-१०५-दुरुस्त-२२-मृत्यू-१