CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाने मुलानंतर वडिलांचा घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 11:39 PM2020-07-14T23:39:26+5:302020-07-14T23:42:05+5:30

कोविड पॉझिटिव्ह रुग्णसंख्या नवनवीन उच्चांक गाठत असताना मंगळवारी पहिल्यांदाच एकाच घरातून दोन कोविड रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. चार दिवसापूर्वी मुलाचा तर आज त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या ३८ झाली.

Corona Virus in Nagpur: In Nagpur, Corona killed father after a child | CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाने मुलानंतर वडिलांचा घेतला बळी

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाने मुलानंतर वडिलांचा घेतला बळी

Next
ठळक मुद्देतब्बल १४८ रुग्ण पॉझिटिव्ह : मृतांची संख्या ३८ : चौथ्यांदा गेली रुग्णसंख्या शंभरावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड पॉझिटिव्ह रुग्णसंख्या नवनवीन उच्चांक गाठत असताना मंगळवारी पहिल्यांदाच एकाच घरातून दोन कोविड रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. चार दिवसापूर्वी मुलाचा तर आज त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या ३८ झाली. शिवाय, तब्बल १४८ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या २५०५ वर पोहचली. वाढते रुग्ण व मृत्यूसंख्येने आरोग्य यंत्रणेत चिंता व्यक्त केली जात आहे. नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी मृत्यूची नोंद झाली. या महिन्यात मृतांची संख्या १४ झाली आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण ८० वर्षीय होते. मनीषनगर येथील रहिवासी असलेल्या या रुग्णाला कोविड सोबतच उच्च रक्तदाब, टाईप टू मधुमेहाचा आजार होता. मेयोत उपचार सुरू असताना मध्यरात्री १२.३० वाजता मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या रुग्णाच्या मुलाचा मृत्यू १० जुलै रोजी झाला. ४९ वर्षीय या रुग्णावर मेयोत उपचार सुरू होते. उच्च रक्तदाब, टाईप टू मधुमेह व थॅलेसेमियाचा आजार होता. मुलाच्या पाठोपाठ वडिलांचा मृत्यूचे हे पहिलेच प्रकरण आहे. प्राप्त माहितीनुसार, मृताच्या कुटुंबातील बहुसंख्य सदस्य पॉझिटिव्ह आहेत. ज्या कार्यालयात मुलगा काम करीत होता तिथेही काही लोक पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येते.

एम्समध्ये ६८ रुग्ण पॉझिटिव्ह
सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद एम्सच्या प्रयोगशाळेत झाली. ६८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या शिवाय, नीरीच्या प्रयोगशाळेतून १८, मेयोच्या प्रयोगशाळेतून १३, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ७, माफसूच्या प्रयोगशाळेतून १६, खासगी लॅबमधून ९, रॅपिड अ‍ॅण्टीजन चाचणीमधून ६ इतर लॅबमधून ११ असे १४८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोविडच्या पार्श्वभूमीवर एप्रिल, मेमध्ये प्रत्येकी एकवेळा तर जूनमध्ये दोन वेळा अशी एकूण चार वेळा रुग्णसंख्येने शंभरी गाठली आहे. आज ४० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत १५८५रुग्ण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात ६३.२ टक्के एवढे आहे.

या वसाहतीत आढळले रुग्ण
विनोबा भावे नगर ४, शहीद चौक १, गांधीबाग महाल २, दुबे नगर १, शक्ती मातानगर वाठोडा ३, झिंगाबाई टाकळी १२, गोकुळपेठ १, भोला कांजी हाऊन १, कुंदनलाल गुप्ता नगर १, जुनी शुक्रवारी १, न्यू सुभेदार नगर १, म्हाळगीनगर १, नरसाळा १, नाईक तलाव १, हजारी पहाड १, बेसा २, भोयीपुरा १, धम्मदीपनगर १, भरतवाडा १, भांडेप्लॉट २, समता नगर १, खरबी १, अजनी १, मोमीनपुरा १, सरस्वतीनगर १, चिंचभवन १, दाभा १, कुशी नगर २, शंभूनगर १, जुनी मंगळवारी १, गड्डीगोदाम १, गोरेवाडा १, कळमना १, आरबीआय कॉलनी १, जुना सुभेदार ले-आऊट २ असे ६२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंद झालेले हे रुग्ण आहेत.

कामठीत २६ रुग्णांची भर
कामठी तालुक्यात आज २६ कोरोनाबाधितांची भर पडली. छत्रपतींनगर १० बाधित रुग्ण मिळून आल्याने ही वसाहत हॉटस्पॉट तर नाही ठरणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ८७ झाली असून, कामठी शहरात ७१, येरखेडा ७, भिलगाव ३, रनाळा २ व नांदा, कोराडी, महादुला, बिडगाव, प्रत्येकी एक कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे.

संशयित : २६००
बाधित रुग्ण : २५०५
घरी सोडलेले : १५८५
मृत्यू : ३८

Web Title: Corona Virus in Nagpur: In Nagpur, Corona killed father after a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.