CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाबाधित नऊ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 11:56 PM2020-07-25T23:56:53+5:302020-07-25T23:58:23+5:30
कोरोनाबाधित नऊ वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूने शनिवारी खळबळ उडाली. विदर्भात आतापर्यंत सर्वात कमी वयाच्या रुग्णाचा मृत्यू म्हणून याकडे पाहिले जात आहे. यासह आणखी सहा मृत्यूची नोंद झाली. यात दोन तरुणांचाही समावेश आहे. आज १५० रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्णांची संख्या ३८३७ झाली, तर मृतांची संख्या ७६ वर पोहोचली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधित नऊ वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूने शनिवारी खळबळ उडाली. विदर्भात आतापर्यंत सर्वात कमी वयाच्या रुग्णाचा मृत्यू म्हणून याकडे पाहिले जात आहे. यासह आणखी सहा मृत्यूची नोंद झाली. यात दोन तरुणांचाही समावेश आहे. आज १५० रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्णांची संख्या ३८३७ झाली, तर मृतांची संख्या ७६ वर पोहोचली. विदर्भातील अकोला जिल्ह्यात कालपर्यंत सर्वात कमी म्हणजे २१ वर्षीय मुलीच्या मृत्यूची नोंद होती. आता नागपुरात त्यापेक्षा कमी वयाच्या मुलाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अमरावती येथील रहिवासी असलेला हा रुग्ण १५ दिवसापूर्वी नागपूर मेडिकलच्या बालरोग विभागात भरती झाला होता. परंतु तीन दिवसानी स्वत:हून सुटी घेऊन परत गेला. काही दिवसानी पुन्हा तो मेडिकलमध्ये भरती झाला. आला तेव्हा त्याला क्वॉड्री पॅरालिसीस झाले होते. त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता. यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दोन दिवसापूर्वी इन्ट्युबेटेड करण्यापूर्वी त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता अहवाल पॉझिटिव्ह आला. आज दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरा मृत्यू ६२ वर्षीय पुरुषाचा झाला. टेका येथील रहिवासी असलेला हा रुग्ण २३ जुलै रोजी मेडिकलमध्ये भरती झाला. न्यूमोनियासह इतरही आजार होते. आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिसरी मृत व्यक्ती ६८वर्षीय पुरुष होती. आझाद कॉलनी मोठा ताजबाग येथील या रुग्णाला उच्चरक्तदाब, मधुमेहासह न्यूमोनिया झाला होता, आज पहाटे मृत्यू झाला. चौथा मृत्यू मेयोमध्ये झाला. ३६ वर्षीय महिलेला गंभीर स्थितीत रुग्णालयात आणले. उच्चरक्तदाब, मधुमेह व लठ्ठपणा होता. उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृत्यूनंतर अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला. पाचवा मृत्यू ३४ वर्षीय युवकाचा झाला. कळमना येथील या रुग्णाला गंभीर स्थितीत २२ तारखेला मेयोमध्ये भरती केले. उपचार सुरू असतनाा आज सकाळी मृत्यू झाला, तर सहावा मृत्यू कामठी येथील ५० वर्षीय रुग्णाचा आहे.
ग्रामीणमध्ये ४७ तर शहरात १०३ रुग्ण बाधित
रॅपिड अॅण्टीजन तपासणीत पुन्हा ४० रुग्ण पॉझिटिव्ह आले. या शिवाय मेयोच्या प्रयोगशाळेत ३१, मेडिकलच्या प्रयोगशाळेत १३, एम्सच्या प्रयोगशाळेत १९, माफसूच्या प्रयोगशाळेत २५ असे एकूण १५० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात ४७ रुग्ण ग्रामीण भागातील तर १०३ रुग्ण शहरी भागातील आहेत. आज ८५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या २३९२ झाली आहे.
या वसाहतीत आढळून आले
बाधित रुग्ण आरोग्य विभागाकडे सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंद झालेल्या रुग्णांमध्ये पाचपावलीमधील ६, नारी २, पार्वतीनगर २, चंद्रनगर ९, रामटेकेनगर १, पाचनल चौक रामबाग १, कुकडे ले-आऊट ३, हावरापेठ २, मानेवाडा बेसा रोड १, अमरनगर १, उंटखाना १, अभिनव रेसिडन्सी अमरावती रोड ३, यशवंत स्टेडियम परिसर १, वसंतराव नाईक झोपडपट्टी २, डागा ले-आऊट २, राजीवनगर १, हिंदुस्तान कॉलनी रामनगर १, सिव्हील लाईन्स १, हनुमाननगर १, नागपूर जीएमसी १, अयोध्यानगर १, सोमवारी क्वॉर्टर ३, गोळीबार चौक १, भालदारपुरा १, महाल ३, इतवारी १, मोहननगर १, जरीपटका ३, मानकापूर १, पेन्शननगर १, मॉर्टीनगर १, चावला चौक ३, गोधनी २, आनंदनगर ४, झिंगाबाई टाकळी १, सूर्यनगर कळमना ५, गरोबा मैदान १, कळमना १, भांडेवाडी पारडी १, वर्धमाननगर १, भवानी मंदिर पारडी १, भवानीनगर पारडी १, भंडारा रोड १, छापरूनगर ३, धंतोली ४, लक्ष्मीनगर १, जयताळा २, त्रिमूर्तीनगर २, खापरी नाका ३, चिंचभवन १, सीताबर्डी २, भेंडे ले-आऊट इंद्रप्रस्थनगर १, खामला १, मेहंदीबाग १, शांतिनगर १, इतवारी १, न्यू मंगळवारी १, लकडगंज १, सक्करदरा १, गाडगेबाबानगर १, मोठा ताजबाग १, खरबी १, नंदनवन ३, भांडे प्लॉट येथील १ रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.
दैनिक संशयित :३०३
बाधित रुग्ण : ३८३७
घरी सोडलेले : २३९२
उपचार घेत असलेले रुग्ण : १३६९
मृत्यू : ७६