CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या १५ हजारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:01 PM2020-08-18T22:01:26+5:302020-08-18T22:03:01+5:30

कोरोना संसर्गाचा वेग कमालीचा वाढल्याने ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. मागील १८ दिवसात तब्बल १०२४५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मंगळवारी यात १०२४ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १५६३७ वर पोहचली.

Corona virus in Nagpur: The number of corona viruses affected in Nagpur is over 15 thousand | CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या १५ हजारावर

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या १५ हजारावर

Next
ठळक मुद्दे१०२४ नव्या रुग्णांची भर, ३७ मृत्यू : ग्रामीण भागातील १२१, शहरातील ९०३ रुग्ण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गाचा वेग कमालीचा वाढल्याने ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. मागील १८ दिवसात तब्बल १०२४५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मंगळवारी यात १०२४ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १५६३७ वर पोहचली. ३७ रुग्णांचा मृत्यूचीही नोंद झाल्याने मृतांची संख्या ५४९ झाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील १२१ तर शहरातील ९०३ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. ३१जुलै रोजी कोरोनाबाधितांची संख्या ५३९२ होती, गेल्या १८ दिवसात यात तीन पट वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. यात वाढत्या मृत्यूसंख्येने चिंता वाढवली आहे. आज इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) कोरोनाबाधित ११ रुग्णांचे मृत्यू झाले. यात लाकडी पूल येथील ६२ वर्षीय महिला, जरीपटका येथील ७३ वर्षीय पुरुष, नाईक तलाव येथील ६६ वर्षीय महिला, मिनीमाता नगर पारडी येथील ५० वर्षीय महिला, रामनगर कामठी येथील ७५ वर्षीय पुरुष, पवार नगर हुडकेश्वर रोड येथील ७९ वर्षीय पुरुष, सिंधीवन ताजबाग येथील ४९ वर्षीय महिला, चिखली येथील ५७ वर्षीय पुरुष, मोहननगर खलासी लाईन येथील ६७ वर्षीय पुरुष, पाचपावली येथील ६५वर्षीय पुरुष व नंदनवन येथील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. उर्वरीत मृतांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. आज ग्रामीणमध्ये ४, शहरात ३० तर जिल्ह्याबाहेरील तीन अशी ३४ मृतांची नोंद झाली.

खासगी लॅबमधून ३३७ पॉझिटिव्ह
मेयो, मेडिकल व एम्समध्ये सर्वाधिक चाचणी होत असलीतरी त्या तुलनेत खासगी लॅबमधून आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ३३७ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणीत ३७० रुग्णांचे निदान झाले. या शिवाय, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ४७, मेयोच्या प्रयोगशाळेतून ११२, एम्सच्या प्रयोगशाळेतून १५२, नीरीच्या प्रयोगशाळेतून ६ असे एकूण १०२४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आज २८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७१९६ झाली आहे. सध्या ६३२७ रुग्ण उपचार घेत आहेत.

मध्यवर्ती कारागृहातील सर्व रुग्ण बरे
मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानासह अधिकारी, कर्मचारी असे २१६ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. कारागृह प्रशासनाने तातडीने उपाययोजना करीत कारागृहात कोविड केअर सेंटर सुरू केले, तर लक्षणे असलेल्या रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल केले. तातडीच्या उपचारामुळे सेंटरमध्ये उपचार घेत असलेले सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या कारागृहातील कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही.

दैनिक संशयित : ३०४७
बाधित रुग्ण : १५६३७
बरे झालेले : ७१९६
उपचार घेत असलेले रुग्ण : ६३२७
मृत्यू : ५४९

Web Title: Corona virus in Nagpur: The number of corona viruses affected in Nagpur is over 15 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.