CoronaVirus in Nagpur : नागपुरात २६ दिवसानी हजाराखाली आली रुग्णसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:33 PM2020-09-25T23:33:20+5:302020-09-25T23:34:39+5:30

कोरोनाबाधितांची सर्वाधिक नोंद याच महिन्यात झाली. २३४३ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर गेल्या २६ दिवसात पहिल्यांदाच रोजच्या रुग्णाची संख्या हजाराखाली आली. शुक्रवारी ९७१ रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या मंदावली असलीतरी मृत्यूची दहशत कायम आहे.

Corona virus in Nagpur: The number of patients in Nagpur has come down to thousands in 26 days | CoronaVirus in Nagpur : नागपुरात २६ दिवसानी हजाराखाली आली रुग्णसंख्या

CoronaVirus in Nagpur : नागपुरात २६ दिवसानी हजाराखाली आली रुग्णसंख्या

Next
ठळक मुद्दे९७१ रुग्ण व ४१ मृत्यूची नोंद : आकडेवारीतील घोळामुळे रुग्णसंख्या मंदावली का?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधितांची सर्वाधिक नोंद याच महिन्यात झाली. २३४३ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर गेल्या २६ दिवसात पहिल्यांदाच रोजच्या रुग्णाची संख्या हजाराखाली आली. शुक्रवारी ९७१ रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या मंदावली असलीतरी मृत्यूची दहशत कायम आहे. आज ४१ रुग्णांचा जीव गेला. मृतांची एकूण संख्या २३०२ झाली असून रुग्णसंख्या ७२,८९९ वर पोहचली आहे. सप्टेंबर महिन्याची सुरुवातच १४४७ रुग्णांनी झाली. त्यानंतर सलग तीन आठवडे रोजच्या रुग्णांची संख्या १५०० ते २००० हजाराच्या घरात होती. परंतु या आठवड्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत घट दिसून येऊ लागली. यामागे, कमी होत असलेल्या चाचण्या, नमुन्यांचा अहवालास होत असलेला उशीर, की आकडेवारीतील घोळ, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. रुग्णसंख्या अशीच हळूहळू कमी होणार का, असा प्रश्नही सामान्यांना पडला आहे.

प्रयोगशाळेत १४४० रुग्ण पॉझिटिव्ह
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फ त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध माहितीच्या आधारे आज ९७१ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची नोंद आहे. परंतु याच पत्रकात, शासकीय व खासगी लॅबमधून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ही १४४० वर दाखवली आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांवरील उपचारात हयगय होत असल्याची ओरड होत असताना, रुग्णसंख्येच्या आकडेवारीतही घोळ होऊ लागल्याने प्रशासनाची कोरोनाबाबतची गंभीरता कमी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

क्षमतेच्या तुलनेत कमी चाचण्या
एकट्या मेयो, मेडिकलमधील प्रयोगशाळेचा चाचण्यांची क्षमता ७०० वर असताना ४०० चाचण्याही होत नसल्याचे चित्र आहे. इतरही प्रयोगशाळेची हीच अवस्था आहे. मनपाच्या केंद्रावर नागरिक चाचणीसाठी सकाळपासून रांग लावून असतात. सर्वच ठिकाणी गर्दी होते. परंतु प्रत्येक केंद्राचे स्वत:चे नियम व दुपारी १ नंतर नमुने घेणे बंद करीत असल्याने कमी चाचण्या होत असल्याचे वास्तव आहे. आज आरटीपीसीआरच्या १७५४ व रॅपीड अ‍ॅन्टिजनच्या ३८४१ असे दोन्ही मिळून ५५९५ चाचण्या झाल्या. मागील आठवड्यात चाचण्यांची संख्या आठ हजारांवर गेली होती.

१३१८ रुग्ण बरे
पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाºया रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या तीन दिवसांपासूनचे हे चित्र आरोग्य यंत्रणेसाठी दिलासादायक आहे. आज १३१८ रुग्ण बरे झाले. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ५४,८०६ झाली आहे. याचे प्रमाण ७५.१८ टक्के आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील ४४१०५ तर ग्रामीणमधील १०७०१ आहे.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ६९४७
बाधित रुग्ण :७२,८९९
बरे झालेले : ५४,८०६
उपचार घेत असलेले रुग्ण : १५७९१
मृत्यू :२३०२

Web Title: Corona virus in Nagpur: The number of patients in Nagpur has come down to thousands in 26 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.