CoronaVirus in Nagpur : नागपुरात पॉझिटिव्हिटी दर ०.७२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 08:39 PM2021-06-11T20:39:39+5:302021-06-11T20:40:24+5:30

Corona Virus Positivity rate कोरोनाची गंभीरता कमी होऊ लागली आहे. नागपूर जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटीचा दर ०.७२ टक्क्यावर आल्याने समाधानकारक चित्र आहे. मृत्यूदर १.१८ आहे.

Corona Virus in Nagpur: Positivity rate in Nagpur is 0.72 percent | CoronaVirus in Nagpur : नागपुरात पॉझिटिव्हिटी दर ०.७२ टक्के

CoronaVirus in Nagpur : नागपुरात पॉझिटिव्हिटी दर ०.७२ टक्के

Next
ठळक मुद्दे कोरोनात समाधानकारक चित्र : ८९ रुग्ण, ७ मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाची गंभीरता कमी होऊ लागली आहे. नागपूर जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटीचा दर ०.७२ टक्क्यावर आल्याने समाधानकारक चित्र आहे. मृत्यूदर १.१८ आहे. शुक्रवारी ८९ रुग्ण व ७ मृत्यूची नोंद झाली. यात शहरातील ५० रुग्ण, २ मृत्यू तर ग्रामीणमध्ये ३७ रुग्ण, ३ मृत्यू झाले. कोरोनातून बरे होण्याचा दर ९७.६४ टक्क्यांवर पोहचला आहे.

कोरोनाचा दुसऱ्या ‘त्सुनामी’ लाटेने विस्कळीत झालेले जनजीवन सध्या रुळावर येत आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्स‌च्या उपलब्धतेचे निकष लावून नुकतेच निर्बंध अंशत: शिथिल करण्यात आले. परंतु सध्याचा पॉझिटिव्हिटी व मृत्यूदर पाहता हे निर्बंधही आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शुक्रवारी १२,२९० चाचण्या झाल्या. यात शहरात ९,६६४ चाचण्यांमधून ०.५१ टक्के तर, ग्रामीणमध्ये २,६२६ चाचण्यामधून १.४० टक्के बाधित रुग्ण आढळून आले. आज १९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ४,६५,०२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

२३१ रुग्णालयात ४६८ रुग्ण

मार्च व एप्रिल महिन्यात कोरोनाच्या गंभीर रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले असताना, आता जवळपास ९६ टक्क्यांवर बेड रिकामे असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, २३१ कोविड रुग्णालय, कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेंटरमध्ये केवळ ४६८ रुग्ण उपचार घेत आहेत. होम आयसोलेशनमध्ये १७७९ रुग्ण आहेत. आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये १५, पाचपावली सेंटरमध्ये दोन तर, व्हीएनआयटी सेंटरमध्ये एक रुग्ण आहे.

 कोरोनाची शुक्रवारची स्थिती

दैनिक चाचण्या: १२,२९०

शहर : ५० रुग्ण व २ मृत्यू

ग्रामीण : ३७ रुग्ण व ३ मृत्यू

एकूण बाधित रुग्ण :४,७६,२६८

एकूण सक्रिय रुग्ण : २,२४७

एकूण बरे झालेले रुग्ण : ४,६५,०२६

एकूण मृत्यू : ८,९९५

Web Title: Corona Virus in Nagpur: Positivity rate in Nagpur is 0.72 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.