CoronaVirus in Nagpur : नागपुरात सारीचे पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह,१३ नव्या रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 11:43 PM2020-05-09T23:43:21+5:302020-05-09T23:47:05+5:30
‘सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणजे ‘सारी’चे रुग्ण वाढत असताना ते कोविड पॉझिटिव्ह येत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आज पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. यासह दिवसभरात १३ कोरोनाबाधितांची नोंद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणजे ‘सारी’चे रुग्ण वाढत असताना ते कोविड पॉझिटिव्ह येत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आज पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. यासह दिवसभरात १३ कोरोनाबाधितांची नोंद झाली. रुग्णांची संख्या २८३ झाली असून यातील १४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मेडिकलमध्ये ‘सारी’चे १६रुग्ण भरती आहेत. गुरुवारी पांढराबोडी, शताब्दीनगर व मोमीनपुºयातील तीन सारीचे रुग्ण पॉझिटिव्ह आले तर आज शनिवारी जवाहरनगर येथील ५१ वर्षीय पुरुष व पार्वतीनगर मधील २४ वर्षीय पुरुष रुग्णाची भर पडली. विशेष म्हणजे आतापर्यंत मोमीनपुरा, सतरंजीपुरा व कन्टेंटमेंट झोनमधील रुग्णांची नोंद होत असताना ‘सारी’चे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्या वसाहतीमधून समोर येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढत आहे. या रुग्णांसह मेयोच्या प्रयोगशाळेत सात रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात पार्वतीनगरमधील ३१ वर्षीय महिला, रामेश्वरी येथील ४६ वर्षीय पुरुष, मोमीनपुरा येथील ३२ वर्षीय पुरुष चार वर्षाचा मुलगा, ८ वर्षीय मुलगी व १८ व १७ वर्षीय युवती आहे. हे सातही रुग्ण आमदार निवासात क्वारंटाईन होते. एम्सने ८७ नमुने तपासले. यात चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे चारही रुग्ण मोमीनपुºयातील आहेत. यात एक ५५, ३४ व २२ वर्षीय महिला तर ३५ वर्षीय पुरुष आहे. हे पाचही रुग्ण क्वारंटाईन होते.
७७ वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात
मेयोमध्ये उपचार घेत असलेल्या सतरंजीपुरा येथील ७७ वर्षीय वृद्धाने कोरोनावर मात केली. यासह ३० वर्षीय, २४ वर्षीय व २१ वर्षीय युवकांचे नमुनेही १४ दिवसानंतर निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आली. मेडिकलमध्येही उपचार घेत असलेल्या ६० वर्षीय वृद्धासह नऊ रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त झालेल्यामध्ये ४०, ४२, ३२, ३१, २३ वर्षीय पुरुष तर १५, २५ व ३७ वर्षीय महिला आहे. हे सर्व रुग्ण सतरंजीपुरा रहिवासी आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८० झाली आहे.
चांगली सफाई करा नाहीतर तोंडावर थुंकणार: रुग्णांची धमकी
मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये भरती असलेले काही रुग्ण जाणिवपूर्वक त्रास देत असल्याची तक्रार येथील परिचारिकांनी अधिष्ठात्यांकडे केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, चांगले जेवण द्या, नाहीतर काच तोडून बाहेर जाणार, जेवण घेऊन येणाऱ्यांना अलिंगन देणार, अशी धमकी देतात. सफाई करणाऱ्या एका महिलेला तर चांगली सफाई कर नाहीतर तोंडावर थुंकणार, असेही म्हटल्याचे तक्रारीत म्हटले आहे. परिचारिकांच्या या तक्रारीची मेडिकल प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. प्रशासन आता काय भूमिक घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १७७
दैनिक तपासणी नमुने २२८
दैनिक निगेटिव्ह नमुने २१५
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने २८३
नागपुरातील मृत्यू ०३
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ८०
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १६४३
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २३६६
पीडित-२८३-दुरुस्त-८०-मृत्यू-३