कोरोनाचा रेल्वेवर कहर, २३ रेल्वे आजपासून रद्द : प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:45 PM2020-03-17T23:45:59+5:302020-03-17T23:48:14+5:30

रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा कोणत्याही विषाणूच्या संक्रमणाच्या संकटाने रेल्वे मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात येत आहेत. मध्य रेल्वेने १८ मार्च ते १ एप्रिलपर्यंत २३ रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Corona wrecks havoc on Railways, 23 trains canceled from today: Platform ticket 50 Rs | कोरोनाचा रेल्वेवर कहर, २३ रेल्वे आजपासून रद्द : प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये

कोरोनाचा रेल्वेवर कहर, २३ रेल्वे आजपासून रद्द : प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये

Next
ठळक मुद्देरेल्वे प्रवाशांना अडचणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा कोणत्याही विषाणूच्या संक्रमणाच्या संकटाने रेल्वे मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात येत आहेत. मध्य रेल्वेने १८ मार्च ते १ एप्रिलपर्यंत २३ रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जनहितार्थ घेतलेल्या निर्णयामुळे रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.
लांब पल्ला आणि जास्त वेळेच्या रेल्वेत शेकडो प्रवासी एकाच वेळी प्रवास करतात. याशिवाय स्थानकांवर अनेक अन्य रेल्वे पोहोचताच प्रवाशांसह अन्य लोकांचीही गर्दी दिसून येते. स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मोठा निर्णय घेताना प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर मंगळवार, १८ मार्चपासून १६ एप्रिलपर्यंत वाढवून (मध्य रेल्वेचे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, बल्लारशाह, बैतूल व सेवाग्राम स्थानक) ५० रुपये करण्यात आले आहे.

रद्द करण्यात आलेल्या रेल्वे
११००७ मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस १९ ते ३१ मार्च
११००८ पुणे-मुंबई डेक्कन एक्स्पे्रस १९ ते ३० मार्च
११२०१ एलटीटी-अजनी एक्स्प्रेस २३ मार्च व ३० मार्च
११२०२ अजनी-एलटीटी २० व २७ मार्च
११२०५ एलटीटी-निजामाबाद २१ व २८ मार्च
११२०६ निजामाबाद-एलटीटी २२ व २९ मार्च
२२१३५/२२१३६ नागपूर-रिवा २५ मार्च
११४०१ मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस २३ मार्च ते १ एप्रिल
११४०२ नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस २२ ते ३१ मार्च
११४१७ पुणे-नागपूर २६ मार्च व २ एप्रिल
११४१८ नागपूर-पुणे २० व २७ मार्च
२२१३९ पुणे-अजनी २१ व २८ मार्च
२२१४० अजनी-पुणे २२ व २९ मार्च
१२११७/१२११८ एलटीटी-मनमाड १८ ते ३१ मार्च
१२१२५ मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस १८ ते ३१ मार्च
१२१२६ पुणे-मुंबई १९ मार्च ते १ एप्रिल
२२१११ भुसावळ-नागपूर १८ ते २९ मार्च
२२११२ नागपूर-भुसावळ १९ ते ३० मार्च
११३०७/११३०८ कलबुर्गी-सिकंदराबाद १८ ते ३१ मार्च
१२२६२ हावडा-मुंबई दुरंतो २४ व ३१ मार्च
१२२६१ मुंबई-हावडा २५ मार्च व १ एप्रिल
२२२२१ सीएसटीएम-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस २०, २३, २७ व ३० मार्च
२२२२२ निजामुद्दीन-सीएसटीएम २१, २४, २६ व ३१ मार्च

Web Title: Corona wrecks havoc on Railways, 23 trains canceled from today: Platform ticket 50 Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.