लक्षणे नसलेले कोरोनाबाधित अधिक धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:07 AM2021-04-16T04:07:21+5:302021-04-16T04:07:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांचा जीव धोक्यात आलेला आहे. कोरोना रुग्णात ताप, सर्दी, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांचा जीव धोक्यात आलेला आहे. कोरोना रुग्णात ताप, सर्दी, कोरडा खोकला, थकवा या सर्वसामान्य लक्षणांसोबतच आता नव्या लक्षणांचीही त्यात भर पडली आहे. हातपाय दुखणे, डायरिया, डोळे लाल होणे, तीव्र डोकेदुखी, चव-गंध नसणे, त्वचेवर रॅशेस, अशी अनेक लक्षणे दिसून येतात. अशा बाधितांच्या संपर्कात आलेले चाचणी करतात. पण लक्षणे नसलेले कोरोनाबाधित सर्वाधिक धोकादायक आहेत, अशी माहिती स्त्रीरोग तज्ज्ञ तथा आयएमएच्या सहसचिव डॉ. मनीषा राठी व कन्सलटंट क्रिटिकल केअर फिजिशियन डॉ. राजेश अटल यांनी गुरुवारी मनपा आणि इंडियन मेडिकल असोसिएनशतर्फे आयोजित कोविड संवाद या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात गुरुवारी आपला कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, ही भीती अनेकांसाठी धोकादायक ठरते. त्याच भीतीतून रुग्ण हॉस्पिटलकडे धाव घेतो. त्यामुळे आधी आपल्याला काय लक्षणे आहेत, याची काळजी घ्या. स्वत:ला ऑपरेट करा. पल्स ऑक्सिमीटरवर ऑक्सिजनची पातळी ९३ च्या वर आणि पल्स ६० च्या वर असल्यास रुग्णाला हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाही. वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आयएमएशी संलग्नित डॉक्टरांशी संपर्क साधावा. आज प्रत्येकाचा जीव वाचविणे ही सर्व डॉक्टरांची प्राथमिक जबाबदारी झाली आहे. ते सेवा देत आहेत.
...
१७ दिवसानंतर चाचणी आवश्यक नाही
पॉझिटिव्ह आल्यानंतर १७ दिवस गृहविलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. त्यानंतर कामावर जाताना चाचणी करण्याची गरज नाही, अशी माहिती डॉ. मनीषा राठी आणि डॉ. राजेश अटल यांनी दिली. अनेक जण कामावर जाण्यापूर्वी निगेटिव्ह अहवाल मिळावा म्हणून चाचणी करतात. मात्र शासनाच्या दिशानिर्देशानुसार पॉझिटिव्ह रुग्णाचा १७ दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.