हिंगण्यात कोरोनाचे संक्रमण कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:27 AM2020-12-16T04:27:26+5:302020-12-16T04:27:26+5:30
हिंगणा/काटोल : नागपूर जिल्ह्यात हिंगणा आणि काटोल तालुक्यात कोरोनाची साखळी अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात मंगळवारी ७६ रुग्णांची ...
हिंगणा/काटोल : नागपूर जिल्ह्यात हिंगणा आणि काटोल तालुक्यात कोरोनाची साखळी अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात मंगळवारी ७६ रुग्णांची नोंद झाली. गत आठवड्याच्या तुलनेत ही अधिक आहे. हिंगणा तालुक्यात मंगळवारी ८६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तीत वानाडोंगरी येथील ५, हिंगणा, डिगडोह , टाकळघाट व दाभा येथे प्रत्येकी २, कान्होलीबारा, खैरी (पन्नासे) व इसासनी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत तालुक्यातील बाधितांची संख्या ३,७१२ झाली आहे. यातील ३,३५१ रुग्ण बरे झाले. तालुक्यातील आतापर्यंत ८९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काटोल तालुक्यात १०२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात काटोल शहरातील धंतोली, रेल्वे स्टेशन परिसर, खोजा ले-आउट, आययूडीपी परिसर येथे एका रुग्णाची नोंद झाली.