कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या ८० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:09 AM2021-09-22T04:09:51+5:302021-09-22T04:09:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या नव्या बाधित रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच असून मंगळवारी १० नवे बाधित आढळले. ...

Corona's active patient population is over 80 | कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या ८० पार

कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या ८० पार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या नव्या बाधित रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच असून मंगळवारी १० नवे बाधित आढळले. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या मात्र वाढत असून हा आकडा ८० पार पोहोचला आहे.

मंगळवारच्या अहवालानुसार शहरात आठ व ग्रामीणमध्ये २ नवे रुग्ण आढळले. शहरातील एकूण रुग्णसंख्या ४ लाख ९३ हजार २१५ वर पोहोचली असून ग्रामीणमध्ये आतापर्यंत १ लाख ४६ हजार १६६ रुग्ण आढळले. मंगळवारी जिल्ह्यात एकूण ४ हजार ६६६ चाचण्या झाल्या. त्यातील ३ हजार ७५० चाचण्या शहरात तर ९१६ चाचण्या ग्रामीणमध्ये झाल्या. मृत्यूची संख्या १० हजार १२० वर स्थिर आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ८२ सक्रिय रुग्ण असून त्यातील ६० शहरातील व १९ ग्रामीणमधील आहेत.

मंगळवारी तीन रुग्ण बरे झाले व कोरोनातून ठीक झालेल्यांची संख्या ४ लाख ८३ हजार १३ इतकी झाली.

कोरोनाची मंगळवारची स्थिती

दैनिक चाचण्या : ४,६६६

शहर : ८ रुग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : २ रुग्ण व ० मृत्यू

एकूण बाधित रुग्ण : ४,९३,२१५

एकूण सक्रिय रुग्ण : ८२

एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८३,०१३

एकूण मृत्यू : १०,१२०

Web Title: Corona's active patient population is over 80

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.