नागपुरात कोरोनाची द्विशतकाकडे वाटचाल; १९६ रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 10:36 PM2022-01-04T22:36:22+5:302022-01-04T22:36:50+5:30

Nagpur News नागपुरात मंगळवारी १९६ रुग्णांची नोंद झाली, तर ओमायक्रॉनचे पुन्हा ३ रुग्ण आढळून आले.

Corona's double century in Nagpur; 196 patients positive | नागपुरात कोरोनाची द्विशतकाकडे वाटचाल; १९६ रुग्ण पॉझिटिव्ह

नागपुरात कोरोनाची द्विशतकाकडे वाटचाल; १९६ रुग्ण पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्दे ओमायक्रॉनचे पुन्हा ३ रुग्ण पॉझिटिव्ह

नागपूर : कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत सलग ७ दिवसांपासून वाढ होत आहे. बाधितांच्या संख्येची द्विशतकाकडे वाटचाल सुरू झाल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी १९६ रुग्णांची नोंद झाली, तर ओमायक्रॉनचे पुन्हा ३ रुग्ण आढळून आले. कोरोनाबाधितांची संख्या ४,९४,५२२ तर ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १३वर पोहोचली आहे.

नागपूर जिल्ह्यात मागील चार महिन्यांच्या तुलनेत मंगळवारी सर्वाधिक चाचण्या झाल्या. ७,००८ चाचण्यांमधून २.८ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. शहरात झालेल्या ४,०२२ चाचण्यांमधून १६६, तर ग्रामीणमध्ये झालेल्या २,९८६ चाचण्यांमधून २४ रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ६ रुग्णांचीही भर पडली. विशेष म्हणजे ६ जून रोजी १९६ रुग्णांची नोंद झाली असताना सहा महिन्यांनी रुग्णसंख्या २००च्या जवळ पोहोचली. जिल्ह्यात मृतांची संख्या १०,१२३ वर स्थिर आहे. मंगळवारी २६ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ४,८३,७०३ झाली आहे.

-ओमायक्रॉन रुग्णांची विदेश प्रवासाची पार्श्वभूमी

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ‘ओमायक्रॉन’ची लागण झालेल्या तिन्ही रुग्णांची विदेश प्रवासाची पार्श्वभूमी आहे. प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सहा वर्षांचा मुलगा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला असताना मंगळवारी त्याची ३७ वर्षीय आई पॉझिटिव्ह आली. हे कुटुंब युगांडावरून आले होते. सध्या यांच्यावर अमरावती येथे उपचार सुरू आहेत. पूर्व आफिक्रेतून नागपुरात आलेल्या २७ वर्षीय पुरुष रुग्णाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. हा रुग्ण देवलापार रामटेक येथील रहिवासी असून, एम्समध्ये उपचार घेत आहे. पूर्व आफ्रिकेची पार्श्वभूमी असलेल्या ५४ वर्षीय पुरुषालाही ओमायक्रॉनची बाधा झाली. लक्ष्मीनगर येथील रहिवासी असलेल्या या रुग्णावरही एम्समध्ये उपचार सुरू आहेत.

-कोरोनाचे ६९६ रुग्ण ॲक्टिव्ह

नागपूर जिल्ह्यात १० दिवसांपूर्वी कोरोना ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय रुग्णांची संख्या १००च्या आत असताना मंगळवारी ती ६९६ झाली. यात शहरातील ५९६, ग्रामीणमधील ७७, तर जिल्ह्याबाहेरील २३ रुग्णांचा समावेश आहे. प्रत्येक बाधित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण किंवा रुग्णालयातील भरतीची सक्ती मागे घेण्यात आल्याने शासकीयसह विविध खासगी रुग्णालय व संस्थात्मक विलगीकरणात ३४७ रुग्ण भरती होते.

 

Web Title: Corona's double century in Nagpur; 196 patients positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.