संघाच्या विजयादशमी उत्सवावर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 09:57 PM2020-10-10T21:57:58+5:302020-10-10T22:00:06+5:30
RSS Vijayadashmi, Corona, Nagpur Newsराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव यंदा कोरोना संसर्गातच आयोजित होणार. संघाशी जुळलेल्या विश्वस्त सूत्रांचे म्हणणे आहे की, संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मार्गदर्शन केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव यंदा कोरोना संसर्गातच आयोजित होणार. संघाशी जुळलेल्या विश्वस्त सूत्रांचे म्हणणे आहे की, संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मार्गदर्शन केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत होईल. स्वंयसेवकांशी ऑनलाईन मार्गदर्शन ऐकण्यास सांगण्यात आले आहे.
विशेष म्हणजे संघासाठी विजयादशमी उत्सवाचे विशेष महत्व आहे. संघ प्रमुखांच्या मार्गदर्शनाकडे सर्वांच्या नजरा लागून असतात. कारण यात संघाच्या भावी कार्यक्रमांचे संकेत मिळतात. सुरुवातीला पथसंचलनाद्वारे स्वयंसेवक आपल्या अनुशासनाचा परिचय देतात. एखााद्या विख्यात व्यक्तीला अतिथी म्हणूनआमंत्रित करून मोठ्या संख्येने स्वयंसेवकांच्या उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम यंदा अतिशय शांतपणे होईल. ५० निवडक स्वयंसेवकांना आमंत्रित केले जाईल. रेशीमबाग मैदानाऐवजी यंदा हा कार्यक्रम डॉ. हेडगेवार स्मृती भवन किंवा महाल येथील संघ मुख्यालय परिसरात आयोजित करण्याचा विचार केला जात आहे. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी पथ संचलनात तीन लाईन ऐवजी दोन लाईन ठेवण्याचाही विचार केला जात आहे स्वयंसेवकांना सांगण्यात आले आहे की, ६ ते ८ समूहामध्ये आपापल्या घरीच या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी व्हावे.
रेशीमबागेत आज युवा स्वयंसेवक एकत्र येणार
विजयादशमीच्या उत्सवानिमित्त रविवारी ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते ८.१५ वाजेपर्यंत युवा स्वयंसेवक एकत्र येतील. गणवेशात शर्ट, पॅण्ट, पट्टा, टोपीसोबतच मास्कही आवश्यक राहील. संघाच्या भाग क्षेत्रात होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. काही ठिकाणी मोजक्या स्वयंसेवकाच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल.