कोरोनावर विजय मिळवण्याचा संकल्प करुया, सरसंघचालकांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 07:39 AM2020-03-25T07:39:56+5:302020-03-25T07:44:58+5:30
देशात रात्रीपासून लॉकडाऊन घोषित झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून देण्यात येणाऱ्या आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे.
नागपूर - देशावरील कोरोना विषाणूचे संकट अधिकच गंभीर झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपासून पुढचे 21 दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी कोरोनावर विजय मिळवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे.
आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, 'संपूर्ण जगासाठी संकट ठरलेल्या कोरोना विषाणूला हरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशात रात्रीपासून लॉकडाऊन घोषित झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून देण्यात येणाऱ्या आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे.'
''सध्या निर्माण झालेल्या असामान्य परिस्थितीत संघशाखा वेगळ्या पद्धतीने भरवता येतील. तसेच सरकारच्या परवानगीने स्वयंसेवकांनी मदतकार्य सुरू केले आहे,''अशी माहितीही मोहन भागवत यांनी दिली.
"सध्याच्या वातावरणात सरकारने दिलेल्या सूचनांचे जनतेने पालन करावे. आपल्या कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवावा. कोरोनाला रोखण्यासाठी संसर्ग टाळणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे हाच उपाय आहे. त्यामुळे सामाजिक जबाबदारीचे पालन करा,असे आवाहन मोहन भागवत यांनी केले आहे.