CoronaVirus in Nagpur :  चाचण्यांच्या तुलनेत ११.८६ टक्के कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 10:43 PM2021-01-11T22:43:37+5:302021-01-11T22:46:07+5:30

Corona Virus दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या ४०० वर जात असताना चाचण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. सोमवारी मागील दोन आठवड्याच्या तुलनेत सर्वात कमी, ३५७६ चाचण्या झाल्या. यात ४१८ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

CoronaVirus in Nagpur: 11.86 per cent corona infected compared to tests | CoronaVirus in Nagpur :  चाचण्यांच्या तुलनेत ११.८६ टक्के कोरोनाबाधित

CoronaVirus in Nagpur :  चाचण्यांच्या तुलनेत ११.८६ टक्के कोरोनाबाधित

Next
ठळक मुद्दे३५७६ चाचण्या : ४१८ नवे रुग्ण, ६ मृत्यू

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या ४०० वर जात असताना चाचण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. सोमवारी मागील दोन आठवड्याच्या तुलनेत सर्वात कमी, ३५७६ चाचण्या झाल्या. यात ४१८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचा दर ११.८६ टक्के आहे. ६ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ४०२७ तर एकूण रुग्णांची संख्या १२८४१९ वर पोहचली आहे.

नागपूर जिल्ह्यात सोमवारी आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये शहरातील ३६८, ग्रामीणमधील ४७ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. शहरात आतापर्यंत १०१८८९, ग्रामीणमध्ये २५७१३ कोरोनाबाधितांची नोंद झाली. शहरात १, ग्रामीणमध्ये २ तर जिल्हा बाहेरील ३ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत शहरात एकूण २६८०, ग्रामीणमधील ७१२ रुग्णांचे मृत्यू झाले. सोमवारी झालेल्या चाचण्यांमध्ये २९३१ आरटीपीसीआर तर ६४५ रॅपीड अँटिजेन चाचण्या झाल्या. ४०५ रुग्ण बरे झाले असून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ११९८३० वर गेली आहे. ४५६२ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील १४२७ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात तर ३१३५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

ब्रिटनमधील संशयित रुग्णांना रुग्णालयातून सुटी

ब्रिटनहून नागपुरात परतलेल्या आठ संशयित रुग्णांवर मेडिकलच्या विशेष वॉर्डात उपचार सुरू होते. सुरुवातीला यातील तिघांचे आणि नंतर दोघांचे असे पाच संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आली. उर्वरित तीन रुग्णांचा नमुन्यांचा अहवाल १४ दिवस होऊनही पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेतून प्राप्त झाला नाही. यामुळे या रुग्णांचा आरटीपीसीआरचा दुसरा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आल्यास त्यांना सुटी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दैनिक संशयित : ३५७६

बाधित रुग्ण : १२८४१९

बरे झालेले : ११९८३०

 उपचार घेत असलेले रुग्ण : ४५६२

 मृत्यू : ४०२७

Web Title: CoronaVirus in Nagpur: 11.86 per cent corona infected compared to tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.