CoronaVirus in Nagpur : नागपुरात २६९ नवीन पॉझिटिव्ह, १५ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 11:05 PM2020-08-05T23:05:38+5:302020-08-05T23:06:54+5:30
नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोविड-१९ अंतर्गत २६९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर १५ रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता ६,७५२ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोविड-१९ अंतर्गत २६९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर १५ रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता ६,७५२ झाली आहे. तर मृतांची संख्या एकूण २०४ वर पोहोचली आहे. बुधवारी शहरात १७८ आणि ग्रामीणमध्ये नवीन ९१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. मृतांमध्ये २ ग्रामीण, २ शहराबाहेरचे तर ११ जण शहरातील आहेत. बुधवारी एकूण ८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ३,९३३ रुग्ण बरे झालेले आहेत.
मेयो रुग्णालयात बुधवारी ८ रुग्णांचा मृत्यू झाला. यात महाल येथील ५३ वर्षीय पुरुष, इतवारी येथील ७१ व ७७ वर्षीय पुरुष, कामठीतील २६ वर्षीय महिला, लष्करीबाग येथील ४६ वर्षीय पुरुष, तकीया दिवानशाह येथील २२ वर्षीय महिला, मेमन कॉलनी येथील ८३ वर्षीय पुरुष, नालसाहब चौक येथील ६२ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे. मेडिकलमध्ये ६ रुग्णांचा मृत्यू झाला. यात रामकोना छिंदवाडा येथील ५८ वर्षीय महिला, अमरावती येथील ५३ वर्षीय महिला, झमकोली भिवापूर येथील ५५ वर्षीय पुरुष, चंद्रनगर पारडी येथील ५५ वर्षीय पुरुष, सोमवारी पेठ येथील ४२ वर्षीय महिला, न्यू सुभेदारनगर येथील ७८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. एका मृताची माहिती शल्य चिकित्सक कार्यालयाद्वारे उपलब्ध करण्यात आलेली नाही.
मेयोच्या प्रयोगशाळेत ६३, मेडिकल ५८, एम्स २५, नीरी १९, माफसू १९ आणि खासगी प्रयोगशाळेत ४७ तर एंटीजेन टेस्टमध्ये ३८ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.
नागपूर जिल्ह्यात बुधवारी ३९६ संशयित रुग्ण सापडले. बुधवारी एकूण १६८४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत ९०,७२१ नमुने तपासण्यात आलेले आहेत. आतापर्यंत मृत २०४ रुग्णांपैकी ३३ ग्रामीणमधील, ४० शहराबाहेरचे आणि उर्वरित १३१ मृत व्यक्ती शहरातील आहेत.
अॅक्टिव्ह - २६१५
बरे झालेले- ३९३३
मृत - २०४